General news

कुठलीही अडचण आल्यास आपण त्यास सहकार्य करू- माजी आमदार प्रशांत परिचारक

सुर्या कन्स्ट्रक्शनच्या ऑफीसचे उद्घाटन

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर येथे सत्यम दत्ताजीराव पाटील यांनी नवीन सुरू केलेल्या सुर्या कन्स्ट्रक्शनच्या ऑफीसचे उद्घाटन नुकतेच माजी आमदार प्रशांत परिचारक, कल्याण पाटील यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले की दत्ता पाटील यांनी सुरूवातीच्या काळात प्रिटींग प्रेसचा व्यवसाय केला. त्यावेळी प्रिंटिंग ची कामे हाताने करावी लागत .त्याकाळात छोटी मोठी कामे करून व्यवसायात आपली प्रगती करत ते स्थिरस्थावर झाले.व्यवसायात अनेक बदल होत गेले त्याप्रमाणे त्यांनी आपल्या व्यवसायातही बदल केले,आधुनिक तंत्रज्ञान आले, कॉम्प्युटर प्रिटींग आले, तात्काळ कामे होऊ लागली त्याप्रमाणे त्यांनी बदल करून प्रवाहाबरोबर आपला व्यवसायात बदल केला. डिजीटल प्रिटींगही त्यातलाच भाग आहे तोही त्यांनी आपला मोठा मुलगा शिवम पाटील याला या व्यवसायात आणून डिजीटल युगात पदार्पण करत पंढरपूरात दत्त डिजीटलचे नाव नावारूपाला आणले.आज कन्स्ट्रक्शन ला फार मोठे महत्व आहे. पंढरपूरात अकरा मजली इमारतीला परवानगी आहे. हीच गरज ओळखून दत्ता पाटील यांनी आपला मुलगा सत्यम याला बांधकाम व्यवसायात आणले.प्रत्येक ठिकाणी बांधकाम क्षेत्रात अनेक बदल होत असताना अशा नवीन इंजिनिअरची गरज आहे.सत्यमनेही या व्यवसायात पदार्पण केले आहे.त्यांने या व्यवसायात तन मनाने प्रगती करावी ही अपेक्षा व्यक्त केली.त्याला कुठलीही अडचण आल्यास आपण त्यास सहकार्य करू असे आश्‍वासन दिले.

माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी नगरसेवक इब्राहीम बोहरी,मनसे नेते दिलीप धोत्रे,अमर पाटील,महेश परिचारक, युवा नेेते प्रणव परिचारक, जनसेवेचे वैभव पाटील बार्शी, शिवप्रेमीचे संस्थापक नानासाहेब कदम, दिलीप गुरव, नगरसेवक संजय निंबाळकर, सुभाष मस्के सर,पत्रकार सुरक्षा समितीचे रामचंद्र सरवदे,पंढरपूर शहराध्यक्ष चैतन्य उत्पात, विश्‍वास पाटील,पंढरपूर शहरातील सर्व संघटनेचे पत्रकार,पंढरपूर युवा मुद्रक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंदार केसकर यांनी केले.पत्रकार संरक्षण समितीचे भगवान वानखेडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *