सामाजिक न्यूज

छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र च्यावतीने जैन गुरुकुल वसतिगृह येथे खाऊ वाटप

छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र च्यावतीने जैन गुरुकुल वसतिगृह येथे खाऊ वाटप

करियर मार्गदर्शन व अभ्यास चे महत्व याबाबत मार्गदर्शन 

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई,व्हाटसअप – ९७६८४२५७५७

नाशिक / ज्ञानप्रवाह न्यूज : छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक तथा उद्योजक शरद पवार यांच्या हस्ते जैन गुरुकुल वसतिगृह येथे खाऊ वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात पसायदानाने करण्यात आली.

छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे नाशिक येथे जैन गुरुकुल वसतिगृह येथे भेट देऊन विविध प्रकारच्या समस्यांची माहिती घेतली. छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे सर्व प्रकारचे प्रश्न व समस्या सोडवण्यास मदत व सहकार्य केले जाईल, असा शब्द छावा देण्यात आला. छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे सर्व प्रकारची मदत व सहकार्य मोफत केली जाते. पैसे घेऊन जो कोणी व्यक्ती, संस्था व संघटना काम करते, जो कोणी समाजसेवेसाठी पैसे घेतो तो दलाल असतो, असं छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे सांगण्यात आले.

छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक शरद पवार यांनी सर्व अनाथ मुलांना आपल्या जीवनातील मनाचा ताबा, मनाची एकाग्रता, स्थिर मन अस्थिर मन, चंचल मन, अंर्तमन, उत्साह, जिद्द, चिकाटी, धाडस, ध्येय व करियर वर मार्गदर्शन केले.

छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व अनाथ मुलांना आई बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युगे युगे कष्ट व मेहनत करून पुढे कस जाता येईल, अभ्यास का करावा, अभ्यास चे महत्व व अभ्यास वेळ किती व कशा प्रकारे असावी यांचे मार्गदर्शन करताना त्यांनी गुरुकुल वसतिगृह अनाथ मुलांना एमपीएससी परीक्षा, यूपीएससी परीक्षा व स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बना, देश सेवा करा असा सल्ला दिला.

जैन गुरुकुल वसतिगृह विशेष भेट प्रसंगी छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र प्रदेश चे महासचिव व कायदेशीर सल्लागार adv. अलका मोरे पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सौ. ज्योतीताई परदेशी , नाशिक शहर महिला आघाडी अध्यक्ष adv. उषाताई पगारे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष शामराव सुतार, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष ॲड. गौरव तिडके, जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष योगिता सुतार मॅडम, ह.भ.प.लक्ष्मण महाराज, नीलिमा मॅडम, adv. योगिता मॅडम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *