General news

कर्मवीर मध्ये मराठी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

कर्मवीर मध्ये ५ फेब्रुवारी रोजी मराठी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज– पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात रुसा काम्पोनंट आठ अंतर्गत मराठी विभागाच्या वतीने ‘भाषा, साहित्य, संस्कृती: सहसंबंध व प्रभाव’ या विषयावर सोमवार दि.५ फेब्रुवारी २०२४ रोजी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रो.डॉ.प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे ऑडीटर प्रिं.डॉ. शिवलिंग मेनकुदळे हे उपस्थित राहणार आहेत. मॉरिशस येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मधील मराठी विभागाच्या प्राध्यापक डॉ.मधुमती कूंजुल या बीजभाषण करणार आहेत.’ अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी दिली आहे.

त्यांनी प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहिती नुसार हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठा तील प्रा.डॉ.नम्रता बागडे, राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव येथील प्रा.डॉ. मनीषा नेसरकर, देगलूर महाविद्यालय, देगलूर येथील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. विठ्ठल जंबाले, आयडॉल मुंबई विद्यापीठाचे संचालक प्रा.डॉ.संतोष राठोड,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा.डॉ.सर्जेराव जिगे,भाषा, साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषदेचे सचिव प्रा.डॉ.दिलीप बिरुटे,तिफन त्रैमासिकचे संपादक प्रा.डॉ.शिवाजी हुसे, दादा पाटील महाविद्यालय,कर्जत येथील प्राचार्य डॉ.संजय नगरकर व विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभूर्णीचे प्राचार्य डॉ. महेंद्र कदम आदी या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. तरी या आंतरराष्ट्रीय परिषदेत अधिकाधिक प्राध्यापक, संशोधक व अभ्यासकांनी या परिषदेत सहभागी व्हावे.

संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी तयार केलेल्या संशोधन पोस्टर आणि पेपरचे सादरीकरण यावेळी करण्यात येणार असून यातील उत्कृष्ट तीन संशोधन पेपर सादरीकरणास सन्मानित करण्यात येणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी करण्यासाठी मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजाराम राठोड,प्रा.डॉ.रमेश शिंदे, प्रा.डॉ. दत्तात्रय डांगे, प्रा. हरिभजन कांबळे, डॉ. सुमित साळुंखे, प्रा. सारिका भांगे, अभिजित जाधव, सुरेश मोहिते, अमोल माने, अशोक ओंबासे आदींसह शिक्षक- शिक्षकेतर सेवक परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *