State news

HPN चॅनेलचे संपादक नागनाथ सुतार डिजिटल स्टार महागौरव पुरस्काराने सन्मानित

HPN चॅनेलचे संपादक नागनाथ सुतार ‘डिजिटल स्टार महागौरव’ पुरस्काराने सन्मानित

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नागनाथ सुतार यांचा सन्मान

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज :- पुरस्कार म्हणजे कामाची पोचपावती आणि पाठीवर मिळणारी शाबासकीची थाप. असाच एक मानाचा पुरस्कार नागनाथ सुतार यांना प्रदान करण्यात आला. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने डिजिटल महास्टार 2024 हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. सोमवार दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी कोल्हापुरातील कणेरी मठ येथे आयोजित सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.

यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने, चित्रपट अभिनेते गिरीश कुलकर्णी, राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत , राज्य संघटक सुनील उंबरे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे,पंढरपूर शहर अध्यक्ष सचिन कुलकर्णी, तालुकाध्यक्ष तानाजी जाधव यांच्यासह राज्यभरातून आलेले मीडिया क्षेत्रातील सदस्य उपस्थित होते.

HPN यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून उच्च तंत्रकौशल्याला बातमी मूल्याची जोड देणारा ग्रामीण महाराष्ट्रातील डिजीटल स्टार म्हणून नावारूपास येत आहे.पश्चिम महाराष्ट्रात अनेक युट्युब चॅनल्सचे जाळे विणण्याच्या त्यांच्या या महत्त्वपूर्ण कार्याची नोंद घेवून डिजिटल मीडिया संपादक -पत्रकार संघटनेच्यावतीने डिजीटल स्टार महागौरव २०२४ राज्यस्तरीय पुरस्कार हा संपादक नागनाथ सुतार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *