International Chess Day 2024:आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस कधी आणि का साजरा करतात जाणून घ्या



दरवर्षी आपण 20 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन साजरा करतो, या दिवसाचा जन्म संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) च्या कल्पनेतून झाला. जगभरातील बुद्धिबळप्रेमी दरवर्षी या दिवशी त्यांचा आवडता खेळ साजरा करतात, ही परंपरा 50 वर्षांहून अधिक काळापासून चालत आलेली आहे.

 

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन हा FIDE, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने प्रायोजित केलेला बुद्धिबळाचा जगभरातील उत्सव आहे. FIDE चे ब्रीदवाक्य “Gens una sumus” आहे, ज्याचा अर्थ लॅटिनमध्ये “आम्ही एक कुटुंब आहोत” असा आहे. ती भावना साजरी करण्याचा आणि जगभरातील आपल्या लाडक्या खेळाचा प्रचार आणि प्रशंसा करण्याचा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस साजरा करण्यात येतो. 

 

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवसाची कल्पना सर्वप्रथम संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) ने मांडली होती. FIDE द्वारे इव्हेंटची स्थापना केल्यानंतर 1966 मध्ये हा प्रथम साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र महासभेने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस म्हणून मान्यता देणारा ठराव एकमताने मंजूर केला.

 

बुद्धिबळ खेळाचा उगम भारतातून झाला. भारतापासून इराणपर्यंत जगभरात पसरल्यानंतर या खेळाला युरोपीय देशांनी हे नाव दिले. पूर्वी हा खेळ चतुरंग या नावाने ओळखला जात होता, कालांतराने त्याचे नाव बदलून त्याला बुद्धिबळ आणि इंग्रजीत चेस असे नाव देण्यात आले.

 

Edited by – Priya Dixit 

 

 



Source link


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe