उजनीच्या उपकालव्या साठी भूसंपादीत जमिनींचा मोबदला हा नव्या दराने मिळावा – कल्याण काळे

उजनीच्या उपकालव्यासाठी भूसंपादीत झालेल्या जमिनींचा मोबदला हा नव्या दराने मिळावा – कल्याण काळे Compensation for land acquired for Ujani sub-canal should be given at new rate – Kalyan Kale
पंढरपूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंञी जयंत पाटील,सोलापुर जिल्ह्याचे पालकमंञी दत्ताञय भरणे, वसंतबाग आढीव ता.पंढरपूर येथील फार्म हाऊसवर आले असता सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याण काळे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. 

   याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे,माजी आमदार दिपक साळुंखे,विठ्ठल सहकारीचे चेअरमन भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा, तालुका, शहरातील सर्व पदाधिकारी,सहकार शिरोमणी, विठ्ठल सह.साखर कारखान्याचे आजी माजी संचालक,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याण काळे यांनी पंढरपूर तालुक्यातील अनेक गावां मधील शेतकऱ्यांच्या जमिनीचे जलसंपदा विभागाने उजनीच्या उपकालव्यासाठी भूसंपादीत झालेल्या जमिनींचा मोबदला हा नव्या दराने व पीक पाण्याची नोंद दुरुस्त करून सर्व शेतकऱ्यांना मिळावा तसेच कासाळगंगा ओढ्यावर पुल व्हावा अशी मागणी केली. 

  याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंञी जयंत पाटील यांनी सकारात्मक उत्तर देऊन लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: