पंचनामा: समंद असंच हाय …..
पंचनामा: समंद असंच हाय …..
पूर्वी समदं गुणाच वाण व्हतं
आता सारं संकरीत वाण हायत
कपाळी कुकू असल तर हात जोडत व्हत
आता कोण कोणाच्या दावणीला
हे मात्र कळत नाय
नसबंदी केली तरी
दिस कसं जात्यात समजत नाही
नव बी लय भारी ,परचार जोरात
बी उगवल नाय ,शेतकरी कोमात
कर्ज मुक्ती नाय ,फास सुटत नाय
संघटनांच एकमत नाय
शाळेत जाऊनही प्वारास
लीवता वाचता येत नाय
कायदा असूनही दारू गांजा अफू
धंदा जोरात कोणकोणाला इचारतो
नोटांवरल बापू मंत्र यशाचा
आई वडील आश्रमात
जाऊ तिथे खाऊ मंत्र नोकरीचा
शपथ घेतात भ्रष्टाचार करणार नाही
बागायती सोडून कोरड वाहूत चरणार नाही
जाईल तिथे सारे मोठ आहे
अंतरंग मात्र खोटे हे मात्र खरं आहे !!
सुप्रभात
“मनुष्याला चिंता त्याचे चित्त,अस्थिर ,असमतोल
व असंतुलित करते.”!!
गावठी आसूड ...
असूनही त्यांच्यापैकी एक नाथ
पण स्वकर्तुत्वाने झाले अनाथ
कमळ सोडलं घड्याळ बांधलं
आगीतून उठले अन फुफाट्यात पडलं
संमद बाहेर पडलं
सासऱ्याने केलं जावायास भोगायचं आलं
नाथांच्या घड्याळात दहा वाजून दहा
ऐवजी त्यांच्यासह बारा वाजलं”!!
आनंद कोठडीया,९४०४६९२२००
८६०५६३८१४९
