शेतकरी व शेतमजूर महिलांच्या प्रश्नांवर शिवसेना महिला आघाडीने संवाद करावा- उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे

सातारा येथे शिवदुर्गा संवाद दौऱ्याचे आयोजन

शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यां सोबत उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी साधला संवाद

सातारा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९ मार्च २०२४ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यां सोबत सातारा येथे शिवदुर्गा मेळावा आयोजित करण्यात आला.याद्वारे महिलांचे मतदानामध्ये अधिक सहभाग वाढावा, महायुतीच्या उमेदवारांना अधिकाधिक मतदान मिळावं यासाठी महिला शिवसैनिकांनी कशा प्रकारे प्रचार केला पाहिजे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आणि शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विविध योजना राबवत असताना ज्या अडचणी येत असतात त्यातून सरकार त्यांच्या पाठीशी आहे याचा संदेश जावा म्हणून शिवदुर्गा संवाद दौरा आयोजित करण्यात आला असल्याचे उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

आज सातारा येथे शिवसेना महिला आघाडी सोबत डॉ. गोऱ्हे यांनी संवाद साधला. याप्रसंगी संपर्क प्रमुख शारदाताई जाधव, शीतल कचरे,सुलोचना पवार,संगीता पवार, विद्या शिंदे,विमल सुपाणेकर,शोभा जैन,वनिता जाधव,मेघा चोरगे,सुजाता सपकाळ, नीता लोंढे, श्वेता वाघमारे, कल्पना पवार, सुजाता गायकवाड आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास,आनंदाचा शिधा,लेक लाडकी योजना, महिला धोरण यांसारखे निर्णय घेऊन महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरण करण्यावर भर दिला असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यातले शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई अतिशय समर्थपणाने काम करत आहेत.महिलांसाठी,शेतकरी कर्जमुक्ती,उद्योजकता,स्त्रियांची सुरक्षा,महिला विषयक कायदे यावरती जून- जुलै महिन्यामध्ये सातत्याने शिबिरांची मोहीम घेत असल्याचे डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. शेतकरी व शेतमजूर महिलांच्या प्रश्नांवर शिवसेना महिला आघाडीने संवाद करावा असेही त्यांनी आवाहन केले. महिला मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी गाव-गाव बैठका घेऊन त्यांच्यापर्यंत महायुतीचे काम पोहोचवण्याचा निर्धारही महिलांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *