नागरिकांसाठी कोव्हिड 19 ची लस,ऑक्सिजन व रेमडीसिवीर इंजेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्यावेत- नगराध्यक्षांची पालकमंत्र्याकडे मागणी

पंढरपूरातील नागरिकांसाठी कोव्हिड 19 ची लस,ऑक्सिजन व रेमडीसिवीर इंजेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्यावेत- नगराध्यक्षांची पालकमंत्र्याकडे मागणी Immediate availability of Covid 19 vaccine, oxygen and remedicivir injection for the citizens – Mayor’s demand to the Guardian Minister
पंढरपूर,23/04/2021 - आज पंढरपूर येथे  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मिटिंग आयोजित केली होती. यावेळी नगराध्यक्षच्यावतीने माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,पक्षनेते गुरदास अभ्यंकर,सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले .सध्या संपुर्ण भारता सह महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सोलापूर जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.पंढरपूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून सध्या अस्तित्वात असलेली आरोग्य सुविधा (कोव्हिड केअर सेंटर, हॉस्पिटल, दवाखाने) अपुरी पडत असूून त्यांच्यावर खुप ताण पडत आहे. यामध्ये ऑक्सिजन, रेमडीसिवीर इंजेक्शन हे देखील अपुरे पडत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवून मृत्युचे प्रमाण वाढले आहे.पंढरपूर शहरातील नागरिकांना होणारा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्या साठी व नियंत्रित होण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या रुग्णालयांना रेमडीसिवीर आणि  ऑक्सिजनचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करण्यात यावा. 

    पंढरपूर शहराची लोकसंख्या 1 लाख असून शासनाकडुन सात दिवसातून फक्त 200 ते 300 कोव्हिड 19 च्या लसीचा पुरवठा होत आहे.  त्यामुळे नगरपरिषदेने स्थापन केलेल्या लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होवून नागरिकांना लस न मिळाल्याने असंतोष पसरला आहे.दररोज लसीकरण केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.या गर्दीमुळे कोरोना संक्रमण वाढले जाण्याची शक्यता आहे. तरी शहराची लोकसंख्या विचारात घेता व नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीमुळे वाढलेली रुग्णांची संख्या विचारात घेता दररोज 2000 कोव्हिडची लस नगरपरिषदेला मिळावी जेणेकरुन नागरिकांना लसीकरण करुन रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणता येईल अशी मागणी नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: