अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांच्या समस्यांत सतत वाढच

अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांच्या समस्यांत सतत वाढच Actress Shilpa Shetty’s husband Raj Kundra’s problems are constantly increasing

मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि व्यापारी राज कुंद्रा यांच्या समस्यात सतत वाढच होत आहे. अश्लिल चित्रपट porn videos बनवण्यासाठी आणि ते काही अ‍ॅप्सद्वारे प्रसारित केल्याबद्दल राज कुंद्रा हे न्यायालयीन कोठडीत आहेत.मुंबई गुन्हे शाखेकडून याचा तपास केला जात असून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्याची न्यायालयीन कोठडी संपत असतानाच त्याला अभिनेता निर्माता सचिन जोशी यांच्यावर सध्या सुरू असलेल्या एका जुन्या खटल्यात मुंबई हायकोर्टाकडून झटका बसला आहे. त्यात सोन्याच्या योजनेत फसवणूकीचा आरोप झाला होता.

अभिनेता-निर्माता सचिन जोशी यांनी राज कुंद्रा आणि सतयुग गोल्ड यांच्याविरूद्ध सोन्याच्या योजनेतील फसवणूकीचा खटला जिंकला आहे. राज कुंद्रा हे सतयुग गोल्डचे माजी संचालक आहेत.

न्यायालयीन लढाईत सचिन जोशी विजयी

न्यायालयीन लढाईत सचिन जोशी विजयी झाले असून सतयुग गोल्डने सचिन जोशी यांना एक लाख रुपये द्यावेत,असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. यासह कायदेशीर कारवाईत गुंतलेली रक्कम रुपये 300000 भरण्यास सांगितली आहे .

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक सोन्याची ट्रेडिंग कंपनी सुरू केली होती . सचिन जोशी यांनी या कंपनीच्या गोल्ड कार्ड योजनेत गुंतवणूक केल्याचा आरोप केला होता. मार्च 2014 मध्ये त्यांनी सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून 18.58 लाख रुपयांत एक किलो सोनं विकत घेतले. त्यावेळी, त्यांना पंचवार्षिक योजनेंतर्गत सवलतीच्या दरात सोन्याचे कार्ड देण्यात आले आणि असे वचन दिले गेले होते की निर्दिष्ट कालावधी पूर्ण झाल्यानंतर तो त्या बदल्यात सोनं घेऊ शकेल.गुंतवणूकीच्या वेळी शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा या कंपनीत महत्त्वाच्या पदांवर नियुक्त होते. मार्च 2019 मध्ये पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर जोशी यांनी ते कार्ड परत देण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना समजले की वांद्रे-कुर्ला येथील कंपनीचे कार्यालय बंद झाले आहे. यानंतरही त्यांनी कंपनीशी संपर्क साधला पण त्यांना काही उत्तर मिळाले नव्हते .

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: