राजकीय न्यूज

आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते तपकिरी शेटफळ व खर्डी येथील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न

आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते तपकिरी शेटफळ व खर्डी येथील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न

मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ येथे आमदार समाधान आवताडे हे विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात गेले असता आमदार समाधान आवताडे यांच्या कामावर समाधानी होऊन तपकिरी शेटफळ गावचे सरपंच , उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या विकासकामांना पाठिंबा दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास गॅरंटीवर आणि पंढरपूर-मंगळवेढा विधान सभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघांमध्ये सुरू असलेल्या विकास कामांनी प्रभावित होऊन पंढरपूर तालुक्यातील तपकीरी शेटफळ येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला.

केवळ विकासात्मक दृष्टी ठेवून मतदार संघाच्या प्रगतशील परिवर्तनासाठी अहोरात्र झटणारे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आवताडे यांची जनसामान्यांमध्ये विश्वासक प्रतिमा आहे.गावाच्या स्थानिक पातळीवरील धोरणात्मक प्रगतीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार समाधान आवताडे यांच्याबरोबर नेटाने काम करण्याचे यावेळी जाहीर केले.

याप्रसंगी आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून निधी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे यावेळी भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले.खर्डी येथील बोहाळी रस्ता ते दत्ता पाटील रस्त्याचे भूमिपूजन तसेच महावितरण MSEB (DP) चे उद्घाटन यावेळी आमदार समाधान आवताडे व इतर ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले.

याप्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह देशमुख,रत्नाकर महाराज मठाचे मठाधिपती दाजी महाराज,शिवाजी महाराज,सरपंच महादेव मासाळ उपसरपंच काशिलिंग चौगुले ,ग्रामपंचायत सदस्य डॉ. शहाजी साबळे, मोहन चौगुले, बाजीराव बनसोडे, शंकर कांबळे, विठ्ठल बनसोडे, बाळकृष्ण सुडके,विजय देशमुख,माणिक गंगथडे, माजी सरपंच अरुण चौगुले, सुधाकर मासाळ, मारुती मासाळ, माजी उपसरपंच भारत मोरे, दत्ता कोळी, माऊली मासाळ, कृष्णदेव मासाळ अंकुश मासाळ, पिंटू बुरांडे, शहाजी रोकडे, विष्णू सुडके, गोरख माने, बापू मोरे,चिंतामणी पळसे, म्हाळाप्पा भीमा मासाळ, कुंडलिक माने, समाधान चौगुले, नारायण माने, मोहन रोकडे, महादेव मासाळ, तानाजी रोकडे तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *