अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा.के.सी. वेणुगोपाल,महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न

मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/०७/२०२४- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा.के.सी.वेणुगोपाल,महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत गरवारे क्लब, मुंबई येथे काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न झाली.

या बैठकीस विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अविनाश पांडे, प्रदेश कार्याध्यक्षा खा.प्रणिती शिंदे, माणिकराव ठाकरे,खा.इम्रान प्रतापगडी, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा.वर्षाताई गायकवाड,विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील,प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजी मोघे, नसीम खान, खा. चंद्रकांत हंडोरे,आ.कुणाल पाटील,आ.अमिन पटेल, आ. यशोमती ठाकूर,खा.रजनीताई पाटील,माजी मंत्री डॉ.नितीन राऊत,के.सी.पाडवी,सुनिल केदार,अस्लम शेख, डॉ.विश्वजीत कदम,भाई जगताप, चरणसिंग सर्रास,प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे,अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव संजय दत्त,मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, हर्षवर्धन सपकाळ, पृथ्वीराज साठे,रामकिशन ओझा, आशिष दुआ,संपत कुमार, सोनल पटेल, बी.एम.संदीप,प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची आढावा बैठक अखिल भारतीय काँग्रेसचे संघटन सरचिटणीस KC वेणुगोपालजी, प्रभारी रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात,विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष खासदार प्रणिती ताई शिंदे, मुंबई अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड,माजी मंत्री सतेज पाटील, विश्वजित कदम यांच्यासह राज्यातील खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी,मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्यासह आघाडी प्रमुख यांची लोकसभा निवडणूक आढावा, मतदार यादी पूनिरिक्षण कार्यक्रम, आगामी निवडणुका, संघटनात्मक आढावा या संदर्भात संयुक्त बैठक टिळक भवन दादर येथे संपन्न झाली.

यावेळी सोलापूरहून शहर अध्यक्ष चेतन नरोटे,जिल्हा कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार, प्रदेश सरचिटणीस विश्वनाथ चाकोते, संजय हेमगड्डी,प्रदेश चिटणीस किसन मेकाले,नरसिंह आसादे,तिरुपती परकीपंडला,भीमराव बाळगी,रमेश हसापूरे उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top