पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास अमेरिकेतून मदतीचा हात Helping hand from USA to Pandharpur Sub-District Hospital
   पंढरपूर दि.28 :- उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे गरजू, गरीब कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येतात. रुग्णांच्या उपचारासाठी सायकॉन कन्सल्टंटचे रमेश लोकरे आणि स्वाती यलमार (कन्सास, अमेरिका) तसेच एन.राचमले फाऊंडेशन (अमेरिका) यांच्या सौजन्याने बालरोग तज्ञ डॉ.आरदवाड यांनी उपजिल्हा रुग्णालयास दोन ऑक्सिजन कॉन्संट्रेटर व दोन पोर्टेबल व्हेन्टींलेटर देण्यात आले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम यांच्याकडे कॉन्संट्रेटर व पोर्टेबल व्हेन्टींलेटर सुपुर्द करण्यात आले.


   पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयांमध्ये पंढरपूर तालुक्यातील तसेच मंगळवेढा सांगोला, मोहोळ , माळशिरस परिसरातील कोरोना बाधित रुग्ण उपचार घेतात. या ऑक्सिजन कॉन्संट्रेटर व पोर्टेबल व्हेन्टींलेटरमुळे उपजिल्हा रुग्णालयात देण्यात येणाऱ्या उपचाराच्या सुविधेत भर पडली असून याचा उपयोग गरीब व गरजू रुग्णांना करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ.गिराम यांनी दिली. सायकॉन कन्सल्टंट व एन.राचमले फाऊंडेशन अमेरीकेत वास्तव्यास असलेल्या भारतीयांची संस्था असून, या संस्थेमार्फत कोरोना कालावधीत मोठ्या प्रमाणात रुग्णालयांना मदत केली आहे.


  सदर मदत सुपुर्द करतेवेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम, डॉ.भातलवंडे तसेच लातुरचे संजय आयचित उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: