महाराष्ट्र दिन आणि स्वराज्यभूमी प्रतिष्ठान च्या वर्धापन दिनानिमित्त विरगळ संवर्धन मोहीम नाटंबी ता.भोर जि.पुणे येथे राबवण्यात आली
वीसगाव खोरे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०५/ २०२५- महाराष्ट्र दिन आणि स्वराज्यभूमी प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त विरगळ संवर्धन मोहीम नाटंबी ता.भोर जि.पुणे येथे राबवण्यात आली होती.

नाटंबी ता.भोर जि.पुणे येथील नीरा नदीचे प्रवाह पात्राचे बाजूला टेम्बी परिसरात उत्खननांमध्ये एक शिवपिंड, दोन नंदी तसेच चार विरगळींचे अवशेष आढळून आले आहेत.सर्व अवशेष हे काळ्या कातळी दगडात बनवण्यात आलेले आहेत. साधारणतः ५ फूटापेक्षा जास्त खोदकाम करण्यात आले होते.

वातावरणातील बदल यात सातत्याने वाढते तापमान, पावसाळ्यातील पाण्याचा वेगवान प्रवाह यामुळे त्या विरगळी पूर्णतः मातीने व्यापून गेलेल्या होत्या. ४० हुन अधिक ग्रामस्थ व शिवपाईक यांच्या अथक प्रयत्नानंतर ऐतिहासिक ठेवा जगासमोर आला आहे. स्वराज्यभूमी प्रतिष्ठानचे शिवपाईक आणि ग्रामस्थांनी ही मोहीम यशस्वी केली.