खुनाच्या गुन्ह्याची उकल करून आरोपीस अटक करण्यात डहाणु पोलीसांना यश
डहाणू जि.पालघर/ज्ञानप्रवाह न्यूज – दि.१५/०३/२०२४ रोजी दुपारी १.०० वा.चे पुर्वी डहाणू पोलीस ठाणे हद्दीत लोणीपाडा, पाण्याचे टाकीजवळ, पिंटु फौजदार गुप्ता याची चाळ, रुम क्रमांक ०४ ता. डहाणू जि. पालघर येथे अनिशा रविंद्र रेड्डी ऊर्फ अनिशा बरस्ता खातुन वय २२ वर्षे रा. डहाणू लोणीपाडा पाण्याचे टाकीजवळ पिंटु फौजदार गुप्ता याची चाळ रुम नं. ०५, ता. डहाणू जि. पालघर मुळ रा. मोहिरामपुर फलटा दक्षिण-२४ परगना जि.परगना राज्य- पश्चिम बंगाल ही अज्ञात कारणावरुन मयत स्थितीत मिळून आल्याने प्रथम चाळ मालक पिटु फौजदार गुप्ता चय ३८ वर्षे रा.डहाणू यांनी दिलेल्या खबरीवरुन डहाणू पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यु रंजि. नं. १०/२०२४ सी.आर.पी.सी. कलम १७४ प्रमाणे दिनांक १५/०३/२०२४ रोजी अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला होता.
सदर अकस्मात मृत्युचे तपासात मयत हिचा गळा दाबून खुन केल्याचे निष्पन्न झाल्याने अकस्मात मृत्युचे चौकशी अधिकारी सपोनि/विजया गोस्वामी यांनी अज्ञात आरोपीत याचेविरुध्द दिलेल्या तक्रारीवरुन डहाणू पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. १ ७८/२०२४ भादंविसं कलम ३०२ प्रमाणे दि १७/०३/२०२४ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर खुनाचे गुन्ह्याचे गांर्भीय लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील पालघर,अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट पालघर यांचे मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंकिता कणसे डहाणू विभाग यांनी स्वतः तपास हाती घेतला व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीत मिनाजुद्दीन अब्दुल अजीज मुल्ला ऊर्फ रविंद्र रेड्डी वय २६ वर्षे रा.बागदा ठाणा डायमंड हार्बर,दक्षिण २४ परगणा राज्य पश्चिम बंगाल असे असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीच्या शोधार्थ डहाणू पोलीस ठाण्याचे पो.उप निरीक्षक मंगेश मुंढे,पो.ना.मनोज भरसट,पोशि.सुरज लोहार असे पोलीस पथक आरोपीच्या मुळ गावी पश्चिम बंगाल येथे रवाना करण्यात आले होते. त्याठिकाणी सतत ७ दिवस राहुन भाषेची समस्या असताना अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शिताफिने व कौशल्यपणास लावून आरोपीचे ठावठिकाणाची माहीती काढून आरोपी यास ताब्यात घेवुन दि २२/०३/२०२४ रोजी रात्रौ ०२.३० वाजता अटक करण्यात आली व आरोपी यास मुदतीत डहाणू न्यायालयात हजर केले असता आरोपीची दि ०१/०४/२०२४ पावेतो पोलीस कोठडी मंजुर केली आहे. आरोपीत याचेकडे तपास करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्रीमती अंकिता कणसे उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू विभाग या करीत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील पालघर,अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट पालघर यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती अंकिता कणसे, उप विभागीय पोलीस अधिकारी डहाणू विभाग, पोलीस निरीक्षक रणवीर बयेस डहाणू पोलीस ठाणे, सपोनि विजया गोस्वामी, पोउपनि मंगेश मुंढे, वाचक पोउनि सुर्यकांत सोनावणे,पोउनि श्री पवार, सहा.फौ.कुंदन तरे,पोहवा खांडवी, रासम नांगरे,पोना मनोज भरसट, पोना धोडी, पोशि सुरज लोहार, पोशि कदम सर्व नेमणुक डहाणु पोलीस ठाणे तसेच पोहवा विशाल पाटील, पोशि १६९ वाल्मीक पाटील नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.
ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------