डॉ ऋचा पाटील रुपनर यांची आत्महत्या की खुन ? याची विशेष तपास अधिकारी नेमणूक करून चौकशी करण्यात यावी- संभाजी ब्रिगेड

डॉ ऋचा पाटील रुपनर यांची आत्महत्या की खुन ? याची विशेष तपास अधिकारी नेमणूक करून चौकशी करण्यात यावी- संभाजी ब्रिगेड

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – सांगोला येथे फॅबटेक कॅम्पस मध्ये डॉ.सुरज रुपनर आणि त्यांच्या परिवाराच्या त्रासाला कंटाळून डॉ. सुरज रुपनर यांच्या घरी त्यांचीच पत्नी डॉ. रुचा पाटील रुपनर हिला प्रॉपर्टी व पैशासाठी शारीरीक व मानसीक त्रास देऊन मारहाण करुन तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले का ? डॉ.रुचा पाटील रुपनर यांनी आत्महत्या केली का खून केला गेला ? याची विषेश चौकशी अधिकारी नेमणुक करुन संबंधीत गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई करावी कारण याची सखोल चौकशी संबंधीत पोलीस करत नाहीत. त्या पोलीस निरीक्षकांवर स्थानिक आमदार व अन्य अधिकाऱ्यांचा दबाव असल्याचे नातेवाईक व नागरीकांमध्ये कुजबुज होत आहे.

पंढरपूर येथील सर्व डॉक्टर्सनी सांगोला पोलीस ठाण्यात आंदोलन करत डॉ.रुचा पाटील रुपनर आत्महत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची केली मागणी

आजपर्यंत या प्रकरणाचा कोणताही तपास करण्यात आलेला नाही.डॉ.रुचा पाटील रुपनर हिचा मोबाईल रुपनर परिवाराने गायब केलेला आहे.त्यामुळे पुरावे नष्ट करण्याचे प्रकार होत आहेत.गुन्हेगार आजही मोकाट आहे,पुरावे नष्ट करत आहेत.राजकीय शक्तीचा व आर्थिक शक्तीचा वापर करुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी आपण तात्काळ गुन्ह्याचा तपास विशेष चौकशी अधिकारी नेमणुक करुन, संबंधीत सर्व गुन्हेगारांना अटक करुन गुन्ह्याचा योग्य तपास करुन कै.डॉ.रुचा पाटील रुपनर यांना न्याय द्यावा अन्यथा सर्वसामान्य जनतेला घेवून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल अशा मागणीचे निवेदन सोलापूर जिल्हा ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांना आणि पंढरपूरचे आयएमए अध्यक्ष डॉ.सुनील कारंडे यांना संभाजी ब्रिगेडकडून स्वागत कदम,किरणराज घाडगे यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.

पंढरपूर येथील सर्व डॉक्टर्सनी सांगोला पोलीस ठाण्यात आंदोलन करत डॉ.रुचा पाटील रुपनर आत्महत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची केली मागणी


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading