घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग कोसळून गंभीर दुर्घटना

घाटकोपरमध्ये एक महाकाय होर्डिंग कोसळून गंभीर दुर्घटना


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,१४/०५/२०२४– मुंबईला सोमवारी 13 मे ला दुपारी वादळी पावसाचा तडाखा बसला.संध्याकाळी चार वाजल्यानंतर प्रचंड वादळ सुरू झाल्यामुळे सगळीकडे धुळीचे लोट पसरले.त्यानंतर जोरदार पाऊसही झाला.

प्रचंड वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे घाटकोपरमध्ये एक महाकाय होर्डिंग कोसळून गंभीर दुर्घटना घडली.मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार या दुर्घटनेत एकूण 14 जणांचा मृत्यू झाला आहे तसेच 43 लोक जखमी झाले आहेत. मुंबईच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाटकोपर येथील दुर्घटना स्थळावर पाहणी केली. त्यानंतर त्यांनी राजावाडी हॉस्पिटल मध्ये दुर्घटनेतील जखमींची भेटही घेतली.

वादळ आणि पावसाचं वातावरण तयार झाल्यानंतर दुपारीच अनेक ठिकाणी अंधार झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती.

मुंबई बरोबरच ठाणे, मुंब्रा, दिवा, डोंबिवली अशा अनेक ठिकाणी वादळासह पाऊस झाला. त्याचबरोबर पेण,रायगड, पालघरमध्येही काही भागात वादळी वारे होते.मान्सूनपूर्वीचा हा पहिला पाऊस आहे. त्यामुळं तापमान खाली आलं असले तरी या वादळानंतर पाऊस सुरू होण्यापूर्वी ढग दाटून आल्यानं अचानक अंधारी स्थिती निर्माण झाली होती.

वादळामध्ये काही ठिकाणी ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहत होते. या वेगवान वाऱ्यामुळं घाटकोपरमध्ये एक महाकाय होर्डिंग कोसळल्यामुळं गंभीर दुर्घटना घडली आहे.या महाकाय होर्डिंगखाली सुमारे 100 जण अडकले होते.त्यातील सुमारे 60 जण जखमी असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून देण्यात आली असून जखमींवर राजावाडीमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पूर्व द्रुतगती महामार्गावर घाटकोपर पूर्व मधील रमाबाई नगर परिसरातील पेट्रोल पंपाच्यावरील जाहिरातीचे हे भले मोठे होर्डीग कोसळून ही दुर्घटना घडली.

हे होर्डिंग अनधिकृत असून संबंधित जाहिरात कंपनी, रेल्वे प्राधिकरण आणि या अनधिकृत होर्डिंगकडे अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या मुंबई महानगर पालिका विभागाच्या अधिकाऱ्यां विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं केली आहे.

मुंबईतील सर्व होर्डिंगचे ऑडिट करणार

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री घटनास्थळाला भेट दिली.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सर्वांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्याला आमचं प्राधान्य आहे,असं सांगितलं .


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading