लोकशाही संपवायला निघालेल्या भाजपच्या विरोधात खंबीरपणे लढा देत असताना भाजपकडून सुशीलकुमार शिंदे,शरद पवार यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका-आ.प्रणिती शिंदे

उमेदवार मी आहे माझ्याशी भिडा, आमदार प्रणिती शिंदे यांची सातपुतेंवर सडकून टीका


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज – आगामी लोकसभा २०२४ च्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्यावतीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर वडाळा येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवार राम सातपुते आणि भाजपावर टीका करताना सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून मी उभी राहिलेली आहे सुशीलकुमार शिंदे साहेब नाहीत.त्यामुळे तुम्हाला जर भिडायचं असेल तर प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून माझ्या सोबत भिडा, माझ्या वडिलांवर काय आरोप करताय,असे शाब्दीक बाण महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्यासह भाजपवर सोडले आहेत.

यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार, सोलापूर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार शिंदे यांनी,भाजपचे जे उमेदवार माझ्या विरोधात उभे राहिले आहेत त्यांना जनता पार्सल म्हणून संबोधते असे सांगत माता जिजाऊ,अहिल्यादेवी यांचे संस्कार घेऊन सुप्रिया सुळे आणि मी भाजपसारख्या शत्रू विरोधात लढत आहोत. दुसरीकडे सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार हे वयाच्या 83 व्या वर्षी, लोकशाही संपवायला निघालेल्या भाजपच्या विरोधात खंबीरपणे लढा देत आहेत.असे असताना भाजप कडून त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करण्याचा प्रयत्न केला जात आहे.हे दोन्ही ज्येष्ठ नेते महाराष्ट्राच्या जनतेसाठी लढा देत असताना भाजपकडून त्यांच्यावर जे आरोप केले जात आहेत यातून टीका करणाऱ्यांचे संस्कार दिसत असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी आरोप केला आहे.

राम सातपुते यांचे नाव न घेता आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या निवडणुकीसाठी मी उमेदवार म्हणून उभी आहे, वडिलांवरती काय आरोप करता? आणि ज्या माणसाने सोलापूरकरांसाठी संघर्ष केला तो अवघ्या सोलापूरकरांना माहिती आहे तर तुम्ही त्यांना कसले प्रश्न विचारता? ही निवडणूक लढवण्यासाठी भाजप उमेदवाराकडे कोणतेच मुद्दे नाहीत.गेल्या दहा वर्षात त्यांनी कोणतेही विकास काम केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत.तुम्ही माझ्या कामाबाबत बोला, मी लोकांची कामे केली म्हणूनच आमदार झाले, तो पण एक संघर्ष होता.जर तुम्ही त्याला संघर्ष मानत नसाल तर तो माझ्या मतदार संघातील मतदारांचा अपमान असल्याचे म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवारावर जोरदार टीका केली.

आमदार प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, भाजपकडून मागील दहा वर्षात केवळ फसवी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली आहे. त्यांच्याकडे विकासाचा कोणताही मुद्दा नाही. यावेळी आपल्याला लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक लढवायची आणि जिंकायची आहे .


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading