राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; बस आणि टेम्पोच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू

[ad_1]


तमिळनाडूतील तंजावर येथे झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. इतर दोघे जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ALSO READ: जयशंकर यांनी ट्रम्प यांचे युद्धबंदीचे दावे फेटाळले, पाकिस्तानबद्दल मोठी गोष्ट सांगितली

मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूमध्ये एक भीषण रस्ता अपघात झाला. तंजावर-तिरुचिरापल्ली राष्ट्रीय महामार्गावरील सेंगकीपट्टी पुलाजवळ सरकारी बस आणि खाजगी टेम्पो व्हॅन यांच्यात झालेल्या समोरासमोर झालेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला. तंजावरच्या जिल्हाधिकारी प्रियंका बालसुब्रमण्यम यांनी या अपघाताची माहिती दिली आहे.

ALSO READ: या युरोपीय देशाला भूकंपाचा तीव्र धक्का बसला

तंजावरच्या जिल्हाधिकारी प्रियंका बालसुब्रमण्यम यांनी सांगितले की, हा अपघात रात्रीच्या सुमारास झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. सर्वांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहे. 

 

Edited By- Dhanashri Naik 

ALSO READ: दिल्ली-एनसीआरमध्ये वादळ आणि पावसामुळे ६ जणांचा मृत्यू

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top