केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले एनडीएचे स्टार प्रचारक

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले एनडीएचे स्टार प्रचारक

येत्या दि.४ एप्रिलपासून आठवले देशभर प्रचार दौऱ्यावर

मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले हे महाराष्ट्रात महायुतीचे स्टार प्रचारक असून देशभरात राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए चे लोकप्रिय स्टार प्रचारक ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्ष हा एनडीए चा घटक पक्ष आहे.मित्रपक्ष भाजप आणि एनडीए च्या घटक पक्षातील उमेदवार आपल्या प्रचारासाठी ना.रामदास आठवलेंच्या सभांचे आयोजन करीत आहेत.

लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी असून पहिल्या टप्प्यातील विविध उमेदवारांच्या प्रचारासाठी ना.रामदास आठवले येत्या दि.४ एप्रिल पासून देशभर दौरा करणार आहेत.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे येत्या दि.४ एप्रिल रोजी तामिळनाडूत कन्याकुमारी येथे प्रचार दौऱ्यावर रवाना होत आहेत.त्यानंतर दि.५ एप्रिल रोजी उत्तराखंड मधील डेहराडून येथे ना.रामदास आठवले भाजप उमेदवाराचा प्रचार करणार आहेत.दि.६ एप्रिल रोजी पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशात लोकसभा निवडणूकित भाजप उमेदवाराच्या प्रचारसभांना ना. रामदास आठवले संबोधित करणार आहेत.दि.९ एप्रिल ला आसाम मध्ये ना.रामदास आठवले लोकसभा निवडणुकीत भाजप आणि रिपब्लिकन पक्ष उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.दि.१० एप्रिलला ना. रामदास आठवले मणिपूर येथे प्रचार दौरा करणार आहेत.

दि.१२ एप्रिल ला महाराष्ट्रात नागपूर ,चंद्रपूर, गडचिरोली येथे त्यानंतर दि.१३ एप्रिल ला भंडारा गोंदिया, रामटेक आणि नागपूर मध्ये महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार ना.रामदास आठवले करणार आहेत.

दि.१४ एप्रिल रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित सकाळी संसद भवनात आयोजीत कार्यक्रमात ना. रामदास आठवले उपस्थित राहतील.दुपारी ते मुंबईत चैत्यभूमी येथे भीम जयंती निमित्त अभिवादनासाठी उपस्थित राहणार आहेत.

दि.१५ आणि १६ एप्रिल ला ना.रामदास आठवले महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकी च्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांचा प्रचार करतील.दि.१७ एप्रिल रोजी राजस्थान जयपूर येथे भाजप उमेदवारांचा प्रचार ना.रामदास आठवले करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *