कुर्डूवाडीमध्ये लॉकडाऊन,आमदार संजयमामा शिंदे यांना व्यापाऱ्यांचे निवेदन

कुर्डूवाडीमध्ये लॉकडाऊन,आमदार संजयमामा शिंदे यांना व्यापाऱ्यांचे निवेदन Lockdown in Kurduwadi, statement of traders to MLA Sanjay Mama shinde
 कुर्डूवाडी/राहुल धोका - कुर्डूवाडीतील व्यापारी वर्गाने करमाळा मतदार संघाचे आमदार संजय मामा शिंदे यांना कुर्डूवाडी शहरात नगन्य रुग्ण असूनही लॉकडाऊन केल्यामुळे कोरोना लॉक डाऊनचा निर्णय मान्य नसल्याचे निवेदन दिले. आ.संजयमामा शिंदे यांनी शहरातील नागरिकांच्या या निवेदनास तत्काळ प्रतिसाद दिला आहे. त्यांनी याविषयी दोन लस घेणाऱ्या व्यापारी वर्गास दुकाने उघडी ठेवण्याची परवानगीचा निर्णय झाला असून पालकमंत्र्याशी होणाऱ्या बैठकीत सदरचा मुद्दा उपस्थित करून हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन व्यापारी प्रतिनिधींना दिले. 

   यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे,नगराध्यक्ष समीर मुलांणी,हरीभाऊ बागल,दिलीप सोनवर, चंद्रकांत वाघमारे यांनी ही व्यापाऱ्यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवली.

   दि १२ रोजी रात्री शेंडे माळा येथील व्यापारी बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांच्यासमोर व्यापाऱ्यांनी आपले मत मांडले होते. त्यानंतर तेथूनही व्यापार्यांसाठी अनेक प्रयत्न डिकोळे यांनी केले होते .शहरातील अनेक व्यापार आज बंदच होते. आ.संजयमामा शिंदे ,शिवसेना प्रमुख धनंजय डिकोळे ,नगराध्यक्ष समीर मुलाणी यांनी घेतलेल्या सकारात्मक भुमिकेबद्दल फुलचंद धोका यांनी आभार मानले.यावेळी विकास संचेती,राजू पुरवत,भरतेश समर्थ,अभिजित धोका,सौरभ जवंजाळ,निखील धोका,निलेश संचेती आदि व्यापारी उपस्थित होते.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: