सोनके येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 जयंतीनिमित्त सोनके येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

सोनके /सुधाकर खरात /ज्ञानप्रवाह न्यूज- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 जयंतीनिमित्त सोनके ता.पंढरपूर येथे अभिवादन करण्यात आले .
प्रथम राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नागरिक ईश्वर खरात ,सोपान माळी , वसंत पाटील, रावजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले होते.यामध्ये 65 जणांनी सहभाग नोंदवला. तसेच मान्यवराने मनोगत व्यक्त केले सरपंच प्रतिनिधी राजू चंदनशिवे उपसरपंच बाबासाहेब हाके,सहकार शिरोमणीचे व्हाईस चेअरमन भारत कोळेकर, माजी सरपंच मल्हारी खरात,माजी सरपंच दत्तात्रय खरात, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग हाके व ग्रामपंचायत सदस्य नवनाथ गोफणे, ग्रामसेवक अमर वाघमोडे ,माजी सरपंच बाबासाहेब कोळेकर,भाजप उपाध्यक्ष संतोष पाटील ,दत्तात्रय बुधे ,सिताराम कोळेकर, रत्नाकर शेळके, नाथबाबा गलांडे, शुभम महानवर ,दत्तात्रेय बलभीम हाके,चेतन काळे, तानाजी बंडगर,डीएम कोळी सर ,सुधाकर माळी गुरुजी, महादेव मेटकरी ,किरण गोफणे तसेच ग्रामपंचायत कर्मचार्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.


