पर्यावरण रक्षक सायकल मित्र पुरस्काराने सन्मानित
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज : जागतिक सायकल दिन ३ जून आणि जागतिक पर्यावरण दिन दि.५ जून या निमित्ताने पंढरपूर सायकल क्लबच्या ७ व्या वर्धापनदिनी दैनंदिन कामात सायकल वापरणाऱ्या पर्यावरणरक्षक सायकलवीरांचा सन्मान करण्यात आला.पंढरपूर सायकल क्लबचे संस्थापक अध्यक्ष उमेश परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रशांत खलीपे,डॉ.आरिफ बोहरी, प्रणव परिचारक,जहूर खतीब उपस्थित होते.
उपाध्यक्ष सुरज अष्टेकर यांनी स्वागत भाषण केले.कार्यकारी अध्यक्ष अभिजीत कुलकर्णी यांनी क्लबबद्दल माहिती दिली. रेखाताई चंद्रराव यांनी झाड वाचवण्याची शपथ दिली. संतोष पाटोळे आणि सुनील क्षिरसागर यांनी सन्मानित व्यक्तींची माहिती वाचली.

सायकल मित्र पुरस्कार ….
विजयकुमार कापसे, आनंदा माने, भिकाजी जाधव, शंकरराव कदम, श्रीकांत ढाळे, असलम बेदरेकर, वंदनाताई सुरवसे, वंदनाताई बुधनेर यांना सन्मानचिन्ह आणि रोप देऊन गौरवण्यात आले.
विशेष सन्मान :
गणेश अधटराव (२५६ सायकल वाटप) आणि मयूर परिचारक (१३० सायकल वाटप) यांना रोप देऊन सत्कार करण्यात आला.
सायकलवारी संमेलनाचे आव्हान
उमेश परिचारक यांनी २२ जूनला होणाऱ्या सायकल संमेलनात ४,००० सायकलिंग उत्साहींना सहभागी होण्याचे आवाहन केले.
प्रकाश शेटे यांनी आभार मानले.रेखाताई चंद्रराव यांनी सूत्रसंचालन केले.सतीश चंद्रराव, संतोष कवडे,अनिकेत गोजारी, लक्ष्मण पांढरे,निखिल चिंचोळकर,गजेंद्र पवार, महेश भोसले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मदत केली.