श्री विठ्ठल रुक्मिणी पददर्शन रांग पूर्ववत सुरू , जतन व संवर्धन कामामुळे करण्यात आला होता बदल

श्री विठ्ठल रुक्मिणी पददर्शन रांग पूर्ववत सुरू जतन व संवर्धन कामामुळे करण्यात आला होता बदल

भाविक पूर्वीप्रमाणे श्रींचे दर्शन घेऊन पश्चिमद्वारातून जातील बाहेर

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.02 : श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे शासनाच्या निधीतून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली जतन व संवर्धनाचे काम सुरू असून पश्चिमद्वार येथील जतन संवर्धनाचे काम पूर्ण झाल्याने. श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन करून भाविकांना पूर्वीप्रमाणे पश्चिमद्वारातून बाहेर जाता येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन संवर्धनाचे काम सुरू असल्याने पदस्पर्श दर्शन रांगेत बदल करून पश्चिमद्वार ऐवजी उत्तर द्वारातून भाविक दर्शन करून बाहेर जात होते.आता श्रींची पदस्पर्श दर्शन रांग पूर्ववत करण्यात आली आहे.श्रींची पदस्पदर्शनरांग स्कायवॉक वरून दर्शन मंडपात पाय-यावरून अंबाबाई दरवाजा येथून सोळखांबी येथील गरूड खांबा जवळून विठ्ठल गाभा-यात जावून दर्शन घेवून दक्षिण बाजूच्या द्वारातून बाहेर पडून रूक्मिणी गाभा-यात जावून रूक्मिणीचे दर्शन घेतील आणि मंदिराच्या पश्चिम दरवाजाने बाहेर पडतील.

मंदिर जतन संवर्धन कामामुळे दर्शनरांगेत आवश्यकतेनुसार वेळोवेळी बदल करण्यात येतो.त्यामुळे भाविकांना दर्शनरांगेत अडथळा निर्माण होतो.परंतू वारकरी भाविकांचे चांगले सहकार्य लाभत आहे.याशिवाय मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सर्व सदस्य महोदय, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जतन व संवर्धनाचे काम 40 टक्के पूर्णत्वास आले असल्याचे व्यवस्थापक श्री श्रोत्री यांनी सांगितले.

Leave a Reply

Back To Top