राज्यातील कृषी अर्थ व्यवस्था राज्यकर्त्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे रसातळाला-माजी खासदार राजू शेट्टी

राज्यातील कृषी अर्थव्यवस्था राज्यकर्त्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे रसातळाला गेली – माजी खासदार राजू शेट्टी

मान्सूनपुर्व अवकाळी पावसाने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असून सदर पिकांचे तातडीने पंचनामे करून भरीव नुकसान भरपाई देणे गरजेचे

नाशिक /ज्ञानप्रवाह न्यूज – राज्यातील कृषी अर्थव्यवस्था राज्यकर्त्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे रसातळाला गेली आहे. यामुळे राज्याच्या कृषीमंत्र्यांना कृषीमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असल्याचे वाटू लागली असल्याची टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी नाशिक येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शहरातील मध्यवर्ती कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी केले.

यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जवळपास ११ वर्षे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. या ११ वर्षामध्ये कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल होणे अपेक्षित होते.मात्र केंद्राच्या व राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी विभागास उपेक्षित ठेवल्याने राज्याचा कृषी विभाग ओसाड पडला आहे.यामुळे कृषिमंत्र्यांच्या या संपुर्ण वास्तव वक्तव्याचे अपयशाचे धनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आहेत. राज्यात मान्सूनपुर्व अवकाळी पावसाने कांदा , द्राक्ष ,केळी ,भाजीपाला उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असून सदर पिकांचे तातडीने पंचनामे करून भरीव नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे.

राज्यामध्ये मायक्रो फायनान्स कंपन्यांनी धुमाकूळ घातला असून सदर कंपन्यावरती केंद्र अथवा राज्य सरकारचे कोणतेच नियंत्रण राहिलेले नाही.केंद्र सरकारने या कंपन्यांना १२ टक्के सरळ व्याज आकारणी करून कर्जवाटप करणे बंधनकारक असल्याचे सांगूनही सर्रास २२ ते २५ टक्के व्याजाची आकारणी करून सामान्य कर्जदारांची लुबाडणूक करत आहेत. राज्यात जवळपास ७ कोटीहून अधिक मायक्रो फायनान्स चे कर्ज खातेदार असून ३ लाख कोटी पेक्षा अधिक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.

एकीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना फसव्या योजनांची घोषणा करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. फळबाग लागवड अनुदान , विद्यार्थ्यांच्या शिष्युवृत्ती , कंत्राटी कामगारांचे पगार,रोजगार हमी योजनेचे रोजंदारी , विकास कामांची थकीत बिले यासह इतर योजनांच्या निधीला कात्री लावण्यात आली आहे.नाशिक जिल्हा बॅंक सुस्थितीत आणण्यासाठी प्रशासकांनी प्रयत्न केले असतानाही नाशिक जिल्हा बॅंकेतील लाखो शेतकरी व ठेवीदार सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अडचणीत सापडले आहेत.

Leave a Reply

Back To Top