पंढरपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१ – पतंजली योगपीठ व तालुका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्ताने दि २१ जून रोजी एक पृथ्वी,एक आरोग्य या संकल्पनेवर आधारित योग सत्राचे आयोजन तनपुरे महाराज मठ पंढरपूर येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमात विविध स्तरांतील नागरिकांनी सहभाग घेऊन योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे,तहसीलदार सचिन लंगुटे प्रमुख उपस्थिती होती.

प्राचीन परंपरेचे मानसिक,आध्यात्मिक, बौद्धिक आणि शारीरिक फायदे घेण्यासाठी महसूल,पोलीस तसेच इतर शासकीय विभागाचे अधिकारी- कर्मचारी,उमा कॉलेजचे प्राध्यापक शिक्षक तसेच नागरिक उपस्थित होते.

यावेळी योग शिक्षिकांनी विविध योगासने प्रात्यक्षिकासह सादर करत योगाचे आरोग्यदायी फायदे विशद केले.
