जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे जागतिक योग दिन कार्यक्रम संपन्न

जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे जागतिक योग दिन कार्यक्रम संपन्न

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर तालुका विधी सेवा समिती व पंढरपूर अधिवक्ता संघ यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, यांचे निर्देशानुसार शनिवार दि.21 जून 2025 रोजी जिल्हा न्यायालय पंढरपूर आवारामध्ये एस.बी. देसाई, प्रभारी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायाधीश पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली व श्रीमती एस एस पाखले दिवाणी न्यायाधीश व स्तर पंढरपूर यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक योग दिन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्यायाधीश श्रीमती एस एस पाखले यांनी केले. सूत्रसंचालन पंढरपूर अधिवक्ता संघाचे सचिव ॲड ए.एम.देशमुख यांनी केले. सदर कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून समीर बिडकर सर ,योग गुरु श्री राधे मंडल हे उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना योगाचे महत्व सांगून योग प्रशिक्षण दिले.

या कार्यक्रमात न्यायाधीश श्रीमती के जे खोमणे, न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पंढरपूर यांनी उपस्थित न्यायिक अधिकारी,विधीज्ञ वर्ग व न्यायालयीन कर्मचारी यांना योग दिना बद्दल मार्गदर्शन केले.विधी स्वयंसेवक संतोष माने यांनी आभार मानले.सदर योग दिनाच्या कार्यक्रमास न्यायिक अधिकारी न्यायालयीन कर्मचारी व विधज्ञ वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top