
केवळ आंतरराष्ट्रीय योगदिनी योगा करण्यापेक्षा दररोज योगासनाचा अभ्यास करावा – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केरळच्या मलप्पपुरम मध्ये साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन
मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.21 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आंतरराष्ट्रीय योगदिना निमित्त केरळ मधील मलप्पपुरम मधील वैद्यरत्न पी एस वारीयर आर्युवेद महाविद्यालय येथे योगासनाचा सराव केला.राष्ट्रीय आयुष मिशन द्वारे मलप्पुरम येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमात ना.रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहिले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2014 साली संघाकडे 19 जुन हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणुन साजरा करण्याचा प्रस्ताव दिला.तेव्हा जगभारातील 175 देशांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाला पाठिंबा दिला यांची आठवण ना.रामदास आठवले यांनी यावेळी सांगत प्रधानमंत्री मोदीच्या काळात जगाला योगाचे महत्व पटल्याचे गौरवोद्गार ना.रामदास आठवले यांनी काढले.

केवळ आंतरराष्ट्रीय योगदिनी योगा करण्यापेक्षा दररोज योगासनाचा अभ्यास करावा.योगा मुळे मन शांत होते आरोग्य लाभते .भगवान बुद्धांनी जगाला दिलेली विपश्यना ही अनमोल देणगी आहे.विपश्यना मेडिटेशन योगा हे मानवी जीवनात तन मनाचे आरोग्य वर्धक औषधच आहे त्यामुळे दररोज योगा करावा असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी यावेळी केले.