सायबेज आशा ट्रस्टचा भात लागवड उपक्रम करंजे भोर येथे यशस्वीपणे पार‌‌‍

सायबेज आशा ट्रस्टचा भात लागवड उपक्रम करंजे (भोर) येथे यशस्वीपणे पार

भोर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२ जुलै २०२५ – सायबेज आशा ट्रस्टतर्फे करंजे (भोर) ह्या दत्तक गावात भात लागवड उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात ३० सायबेज स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि स्थानिक शेतकरी श्री ज्ञानेश्वर कुडले पाटिल यांच्या १.५ एकर क्षेत्रावर भात लागवड केली. या उपक्रमाचा प्रमुख उद्देश शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतीकामात मदत करणे आणि त्यांच्या कष्टात हातभार लावणे हा होता.

सायबेज आशा ट्रस्ट ग्रामीण भागातील शाश्वत विकासासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवत असतो. भात लागवड, झाडे लावणे, श्रमदान, तसेच जमिनीची मशागत यांसारख्या उपक्रमांद्वारे ट्रस्ट शेतीपूरक विकास आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्यास मदत करतो. तसेच गावांत प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, रस्ता, गटार व पाण्याची व्यवस्था, आधुनिक शेती, शाळा व अंगणवाडी दुरुस्ती व रंगरंगोटी इत्यादी अनेक उपक्रम राबविले जातात.

या उपक्रमामुळे केवळ शेतकऱ्यांना मदत झाली नाही तर स्वयंसेवकांनाही ग्रामीण जीवन आणि शेतीकामाचे प्रत्यक्ष अनुभव घेता आले, जे समाजाशी नाते जोडणारे ठरते.

सायबेज आशा ट्रस्ट भोर आणि राजगड (वेल्हे) तालुक्यातील दत्तक घेतलेल्या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून शिक्षण, आरोग्य, शेती आणि सक्षमीकरण या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.

Leave a Reply

Back To Top