रिपब्लिकन ज्येष्ठ नेते डी एम चव्हाणांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ

        
सत्कार नामांतरलढ्यातील विराचा….

रिपब्लिकन ज्येष्ठ नेते डी एम चव्हाण यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त दि.14 जुलै रोजी सत्कार समारंभ

मुंबई /ज्ञानप्रवाह,दि.१२/०७/२०२५ – रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि भारतीय दलित पँथर पासून आंबेडकरी चळवळीत काम करणारे ज्येष्ठ रिपब्लिकन नेते डी एम चव्हाण यांचा सोमवार दिनांक 14 जुलै 2025 रोजी सा
अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भव्य सत्कार समारंभ घाटकोपर पूर्व झवेरबेन हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.या सत्कार सोहळ्यास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सत्कारमूर्ती डी एम चव्हाण हे सबंध रिपब्लिकन चळवळीत मामा म्हणून लोकप्रिय आहेत.त्यांचा चाहता वर्ग संबंध महाराष्ट्रात विखुरला असून मागील 50 वर्षांपासून डी एम चव्हाण मामा हे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पाठीशी एकनिष्ठ उभे राहिलेले आहेत.निष्ठेने त्यांनी ना. रामदास आठवले यांना खंबीर साथ दिली असून राज्यभर ते सतत ना. रामदास आठवले यांच्या सोबत दौरे करीत राहिले आहेत.मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या ऐतिहासिक ठरलेल्या नामांतर लढ्यात डी एम चव्हाण मामा यांनी ना.रामदास आठवले यांना साथ देत या नामांतर लढ्यात योगदान दिले आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्यावतीने डी एम चव्हाण मामा यांचा 75 वा वाढदिवस अमृतमहोत्सवी सत्कार समारंभ म्हणून आयोजित करण्यात आला आहे.सोमवार दि.14 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता घाटकोपर पूर्व येथील झवेरबेन सभागृह येथे नामांतरवीर डी एम चव्हाण मामा यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यास मोठ्या संख्येने रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे.

ज्येष्ठ नेते डी एम चव्हाण मामा यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभास केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले; सौ सीमा ताई आठवले;कुमार जीत आठवले; स्थानिक आमदार पराग शहा; आमदार मिहिर कोटेचा ,खासदार चंद्रकांत हांडोरे; खासदार संजय पाटील; माजी खासदार मनोज कोटक; लोकप्रिय गायक आनंद शिंदे; अविनाश महातेकर;एम एस नंदा;गौतम सोनवणे सिद्धार्थ कासारे; कृष्णमिलन शुक्ला; काकासाहेब खंबाळकर; बाळासाहेब गरुड, विवेक पवार; अजित रणदिवे;तालुका अध्यक्ष राजाभाऊ गांगुर्डे आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Back To Top