प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनतर्फे रविवारी गायन-वादनाची ‘बरखा रंग’ मैफल
पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज : प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनतर्फे वर्षा ऋतुनिमित्त रविवार, दि.20 जुलै रोजी गायन-वादनाच्या ‘बरखा रंग’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.

बरखा रंग मैफल सायंकाळी 5 वाजता टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारात असलेल्या गणेश हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे.या मैफलीत सुप्रसिद्ध गायक पंडित प्रवीण गावकर गोवा, विदुषी सानिया पाटणकर पुणे यांचे गायन होणार असून पंडित मुकुंदराज देव ठाणे यांचे एकल तबला वादन होणार आहे.

मालू गावकर, देवेंद्र देशपांडे (संवादिनी), प्रशांत पांडव (तबला), वासिम खान (सारंगी) साथसंगत करणार आहेत. शोभा कुलकर्णी यांचे निवेदन असणार आहे.
प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या मातोश्री पुरस्काराने शिल्पा जोशी यांचा गौरव केला जाणार आहे. नितीन महाबळेश्वरकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.मानपत्र,सन्मानचिन्ह, शाल,श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.