मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाव्य कॉरिडार बाधितांची भेट घ्यावी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाव्य कॉरिडार बाधितांची भेट घ्यावी

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूर येथील कॉरिडॉर प्रकल्प राबविला जाईल अशी विधाने करीत आहेत.मात्र ते स्वतः कॉरिडॉर बाधितांना भेटण्यास तयार नाहीत.कालच्या आषाढी एकादशीला प्रशासनाकडे बचाव समितीने मुख्यमंत्र्यांची भेट मागितली होती परंतु मिळाली नाही.

मुख्यमंत्री अनेकांना भेटतात पण कॉरिडार बाधितांना भेटत नाहीत हे योग्य नाही. विश्वासात घेऊनचे पालुपद लावले जाते परंतु भेट दिली जात नाही.उद्याच्या 23 तारखेला श्री संत नामदेव 675 समाधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरला येणार आहेत.नामदेव पायरीचे दर्शन घेणार आहेत.त्यावेळेला त्यांनी आम्हा कॉरिडोर बाधितांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा वेदना जाणून घ्याव्यात. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आम्ही बाधित मंडळी नामदेव पायरीपासून एक मिनिटाच्या अंतरावर हिंदू महासभा भवन या ठिकाणी जमणार आहोत तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हा बाधितांना भेटून विश्वासात घेवून यातून मार्ग काढावा, आमचे म्हणणे ऐकून घ्यावे अशी आमची विनंती आहे असे आवाहन पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती चे अध्यक्ष अभयसिंह ईचगांवकर, सचिव एँड.उंडाळे,उपाध्यक्ष गुरव महाराज, उत्पात महाराज,हरिदास महाराज यांनी केले आहे.

Leave a Reply

Back To Top