अफू या अंमली पदार्थाची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर पालघर पोलीस दलाकडून कारवाई

अफू या अंमली पदार्थाची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर पालघर पोलीस दलाकडून कारवाई

पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०७/२०२५- पालघर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना सक्त सुचना दिलेल्या आहेत.

मोखाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये दि. २१/०७/ २०२५ रोजी ०२.०२ वाजण्याचे सुमारास पो.हवा. शशिकांत भोये व पो.अं. बापु नागरे, नेमणुक मोखाडा पोलीस ठाणे हे रात्री गस्त करीत असतांना मोखाडा-त्र्यंबक रोडने एक क्रेटा कार क्र.MP-09-CZ-6669 ही भरधाव वेगाने जात असताना आढळून आली.सदर कारचा नमूद पोलीस अंमलदार यांना संशय आल्याने त्यांनी पाठलाग केला.मौजे चिचुतार गावचे जवळ नमूद कार चालक हा कारची चावी काढून अंधाराचा फायदा घेवून कार सोडून पळून गेला.सदर कारची तपासणी केली असता त्यामध्ये ७,८०,३४०/- रुपये किंमतीचा एकूण १११.४२० किलोग्रॅम वजनाचा अफू वनस्पतीचे सुकलेल्या बोंडांचा चुरा आणि HR36-AC-2410, MH05-DS-2526 या क्रमांकाच्या बनावट नंबर प्लेट व ८,००,०००/- रुपये किंमतीची क्रेटा कार असे एकूण १५,८०,३४०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात येवून त्याबाबत मोखाडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ११९/२०२५ एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ चे कलम १५ (क) व ८ (क), बी.एन.एस. कलम ३१८, मो.वा.का. कलम १८४ प्रमाणे दिनांक २१/०७/२०२५ रोजी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढिल तपास हा स.पो.नि.प्रेमनाथ ढोले, नेमणुक मोखाडा पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची यशस्वी कारवाई ही पालघर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, जव्हार विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली प्रेमनाथ ढोले, पोउपनिरी/श्रीकांत दहिफळे, पो.हवा.भास्कर कोठारी, पोहवा/भोये, पोहवा/कामडी, पोअं/बापु नागरे, पोअंम/पंकज गुजर सर्व नेमणुक मोखाडा पोलीस ठाणे यांनी केली आहे.

Leave a Reply

Back To Top