सातलिंग शटगार सर आपल्याला मिळालेल्या संधीचं सोने करा आणि काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहा-प्रकाश यलगुलवार

सातलिंग शटगार सर आपल्याला चांगली संधी मिळाली या संधीचं सोने करा आणि काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहा-प्रकाश यलगुलवार

लवकरच जिल्हा दौरा करून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार — सातलिंग शटगार

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ जुलै २०२५ – सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी सातलिंग अण्णाराव शटगार यांची निवड झाली असून आज रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा पदग्रहण सोहळा माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार,शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते,माजी अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर येथे उत्साहात संपन्न झाला.

पदग्रहण सोहळ्याच्या अगोदर नूतन जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर निवड झालेल्या सर्व नूतन पदाधिकारी प्रकाश यलगुलवार,अलकाताई राठोड,राहुल वर्धा, श्रीशैल रणधिरे,रविकिरण कोळेकर,सुरेश हावळे यांचा सत्कार करण्यात आला.

माजी आमदार प्रकाश यलगुलवार म्हणाले की,आज सातलिंग शटगार यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली. त्यांचा पदग्रहण सोहळा होत आहे. शिक्षकी पेशापासून राजकारणाच्या माध्यमातून सक्रिय राहून काँग्रेसच्या ध्येयधोरणाशी प्रामाणिक राहून काम केले याचे फळ आहे.या जिल्ह्याने काँग्रेसचा सुवर्णकाळ पाहिला आहे.एके काळी जिल्ह्यात तेरा आमदार दोन खासदार होते त्या जिल्ह्यातील काँग्रेसचे तुम्ही सैनिक तुम्हाला सर्वांना सलाम,तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले.या जिल्ह्याला खासदार माहीत नसताना व या जिल्ह्यात एकही आमदार नसताना लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या जोरावर प्रचंड मताधिक्याने प्रणितीताई खासदार झाल्या. त्याबद्दल आभार .तुम्ही ज्या भावनेने निवडून दिलेत त्याच तडफेने खासदार प्रणितीताई पायाला भिंगरी लावून गावोगावी फिरून शेतकरी, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवित आहेत. सातलिंग शटगार सर तुम्हाला चांगली संधी मिळाली आहे. ताईंबरोबर दौरा करून काँग्रेस पक्षाचा पताका फडकविण्याची सुवर्णसंधी मिळाली त्या संधीचे सोने करा.काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे पोहोचविण्यासाठी,शेतकरी अडचणीत आहेत त्यांच्या हमीभावाचा प्रश्न, त्यांच्या वाढलेल्या आत्महत्या,वीज पाण्याचा प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरुन काम करत काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

यावेळी बोलताना नूतन जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार म्हणाले की,आदरणीय सुशीलकुमार शिंदे,खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यामुळे मला जिल्हाध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे. त्यांच्या विश्वासास पात्र राहून जिल्हा काँग्रेसचे काम चांगल्या प्रकारे करून पक्ष वाढविण्याचे काम करणार आहे. शिंदे साहेब आणि प्रणितीताई यांच्या मार्गदर्शना खाली लवकरच जिल्ह्याच्या दौर्याची सुरुवात पंढरपूर पासून करणार आहे आणि समारोप अक्कलकोट येथे होणार आहे.या जिल्हा दौऱ्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या अडचणी,बूथ यंत्रणा मजबूत करणे,शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच जनभावना जाणून घेऊन संघटन बांधणीचे काम करणार आहे.त्याचप्रमाणे जिल्हाभर तालुकाध्यक्ष व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मतदारयाद्याचे पडताळणी करण्याचे काम सुद्धा सुरू करणार आहे.१५ ऑगस्ट नंतर जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण,वक्ता प्रशिक्षण घेणार असून त्याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत होणार आहे. पक्षातील गळती थांबविण्यासाठी एक समिती स्थापन करणार नाराजांची नाराजी दूर करून त्यांना पक्षात पुन्हा सक्रिय होण्यासाठीही प्रयत्न करणार आहे.मन,मेंदू मनगटाच्या जोरावर येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करेन, मला संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा खा.राहुल गांधी, खा.प्रियंका गांधी,मल्लिकार्जुन खरगे, माजी केंद्रियमंत्री सुशीलकुमार शिंदे,प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,खासदार प्रणितीताई शिंदे यांचे आभार व्यक्त करतो.

कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार म्हणाले की, भाजपने विधानसभा निवडणुकीत जनतेला अनेक खोटी आश्वासने देऊन फसवले आहे. ही खोटी आश्वासने घराघरात पोहोचवून जनतेला जागृत करण्याची आता गरज आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन भाजपच्या अपयशाची माहिती जनतेसमोर मांडावी आणि काँग्रेस पक्षाच्या भक्कम तयारीला सुरुवात करावी,असे आवाहन त्यांनी केले आहे.

काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की,काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी सातलिंग शटगार यांसारख्या निष्ठावान आणि कार्यक्षम नेत्याला संधी देण्यात आली आहे हीच त्यांच्या निष्ठेची आणि संघटनात्मक क्षमतेची खरी कसोटी ठरणार आहे.त्यांनी चांगल्या प्रकारे काम करून पक्ष बळकट करावा, जनाधार वाढवावा आणि काँग्रेसचा विश्वास कायम ठेवावा.काँग्रेसला आजही भक्कम जनाधार असून या पक्षाने आजपर्यंत भरपूर विकासकामे केली आहेत.जनतेत विश्वासाची परंपरा निर्माण केलेल्या पक्षाला बळकट करण्याचे काम करावे लागेल.

माजी आमदार विश्वनाथ चाकोते म्हणाले की,जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार कामगिरी करून काँग्रेस पक्षाला फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उभारी द्यावी.सध्याच्या राजकीय परिस्थितीत नव्या जोमाने संघटना बळकट करून पक्षाला नवसंजीवनी देणे हेच उद्दिष्ट ठेवून काम करावे.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील म्हणाले की, जिल्हाध्यक्षपद हे काटेरी मुकुट आहे.सत्ताधारी हे काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना दबावात आणत आहेत आणि आपल्या पक्षात ओढण्याचा प्रयत्न करतात.अशा परिस्थितीत संघटनेला एकत्र ठेवून मजबूत करण्याचे मोठे आव्हान आहे.

कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार,माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील,वरिष्ठ उपाध्यक्ष जुगल किशोर तिवाडी,प्रदेश सेक्रेटरी अँड. रवीकिरण कोळेकर,सुरेश हावळे,उपाध्यक्ष अर्जुन पाटील, मोतीराम चव्हाण, राधाकृष्ण पाटील, राजेश पवार ,अशोक देवकते, तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी, प्रशांत साळे, सुदीप चाकोते, सतीश पाचकुंडवे, संजय पाटील, हनुमंत मोरे, भारत जाधव, किशोर पवार, फिरोज खान, विमुक्त जाती भटक्या जमाती जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, सिद्राम पवार, सरचिटणीस सिद्राम सलवदे, जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड,सुनील रसाळे, गणेश डोंगरे, प्रमिला तुपलवंडे, वाहिद विजापूरे, नरसिंह आसादे, आरिफ पठाण, श्रीशैल रणखांबे, जाहीर मनेर, नागनाथ कदम, किरण सुर्वे असलम शेख, नंदाताई कांबळे ,अंजली वस्त्रे, विद्या बिले, संदीप मोरे, बीरा खरात, अशोक कस्तुरे, रोहित शटगार, मोतीलाल सुतार, सचिन खैरे पाटील, अमीर शेख, मौलाली शेख, हणमंतू सायबोलू, तिरुपती परकीपंडला, नूर अहमद नालवार, देवाभाऊ गायकवाड, अनिल मस्के, सागर उबाळे,लखन गायकवाड,पशुपती माशाळ,धीरज थोरात,शफी हुंडेकरी,संजय गायकवाड,युवराज जाधव,राजेंद्र शिरकुल, विवेक कन्ना,NK क्षीरसागर,शिवशंकर अंजनालकर, राजेश झंपले, धीरज खंदारे, महेंद्र शिंदे,सुमन जाधव,महेश लोंढे,रुस्तुम कंपली, सुभाष वाघमारे,शफी हुंडेकरी,वशिष्ठ सोनकांबळे,भीमराव शिंदे,चक्रपाणी गज्जम, भारती इप्पलपल्ली,रेखा बिनेकर,सुमन जाधव, शशिकांत जाधव, सुबोध सुतकर, हारून शेख,चंदू नाईक,पप्पू गारे,उपेंद्र ठाकर, शिवाजी साळुंखे, पंडित गणेशकर, ज्योती गायकवाड, संध्याताई काळे, छाया हिरवटे, पूजा चव्हाण,चंदा काळे,व्यंकटेश बोमेंन, सचिन सुरवसे,चिंटू कांबळे,अनिता भालेराव, सुनील डोळसे,आप्पा सलगर,मोहसीन फुलारे,मुमताज शेख,अभिलाष अच्युगटला, मीना गायकवाड,दत्तात्रय गजबार,दत्ता पवार, शिवशंकर जकुने, सुहास भाळवणकर, बजरंग बागल, मिलिंद आढवळकर, देवानंद इरकल, समीर कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top