आषाढी एकादशी महापुजेला आयोध्या पॅटर्न राबवा
आषाढी एकादशी मुख्यमंत्र्यांच्या महापुजेत मानाच्या पालखींच्या प्रतिनिधी येणे ठरले वादाचे कारण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श घ्यावा
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेची शासकीय महापुजा मुख्यमंत्री यांच्या हस्ते केली जात असते.सध्या महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. परंतु त्यांना पंतप्रधान मोदी यांच्या आदर्शाचा विसर पडलेला आहे. कारण आयोध्या येथील श्रीराम मुर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यावेळी पंतप्रधान यांनी स्वत: एकटे येवून कार्यक्रम पार पाडला.व्हीआयपींना उंबऱ्याच्या बाहेरून दर्शन दिले.
सध्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या महापुजेत मानाच्या पालखीच्या प्रतिनिधींना उपस्थित राहता यावे यासाठी मिटींगमध्ये मागणी केली. परंतु मंदिर समितीच्या शनिवारी झालेल्या मिटींग मध्ये असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी मुख्यमंत्री यांच्या कार्यालयाकडून कोणतेही आदेश आलेले नाहीत म्हणून आम्ही निर्णय घेतला नाही.या निर्णयावर सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या मिटींगमध्ये जिल्हा प्रशासन निर्णय घेईल असे सांगितले.
आषाढी यात्रेला सुमारे 15 लाखांपेक्षा जास्त भाविक येतात त्यांना पददर्शन घेण्यासाठी 30 ते 40 तास लागतात.अनेक हालअपेष्टा सहन करून ही ते केवळ देवाचे दर्शन व्हावे यासाठी सर्व सहन करतात. मुख्यमंत्री यांच्या महापुजेवेळी मोठ्या संख्येने व्यक्ती उपस्थित राहणार आहेत अशी माहिती समजते तरी सदरच्या लोकांना आयोध्या श्रीरामांच्या मुखदर्शनाप्रमाणे श्री विठ्ठलाचे मुखदर्शन देण्यात यावे व आयोध्या पॅटर्न राबविण्यात यावा तसेच मानाच्या पालखी प्रतिनिधींना नित्यपुजेत सहभागी करून घेण्यात यावे. त्यांना रोज ज्याप्रमाणे सामान्य भाविक विठ्ठलाकडे 25 हजार रूपये व रूक्मिणीकडे 11 हजार रूपये भरतात त्यावेळी 10 भाविकांना पुजेत सहभागी होता येते त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी देखील कुटूंबातील केवळ 10 व्यक्तीच सोबत आणून महापुजा संपन्न करावी.आषाढी एकादशी मुख्यमंत्र्यांच्या महापुजेत मानाच्या पालखींच्या प्रतिनिधी यांना प्रवेश देण्याच्या मागणीवर पंढरपुरातील काही संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे मुख्यमंत्री मोजक्या व्यक्तींसह महापुजा करून पंतप्रधान मोदी यांचा आदर्श घेणार की त्यांचा आदर्श पायदळी तुडविणार ? याकडे आता सामान्य भाविकांचे लक्ष्य लागले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सामान्य भाविकांच्या हिताचा निर्णय घ्यावा तसेच महापुजेला किती लोक उपस्थित रहावेत यासाठी आळंदीच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या धर्तीवर मा.मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय घ्यावा अशी मागणी सोलापूर जिल्हा कॉंग्रेस ब्राह्मण सेलचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बडवे- शिंदे यांनी केली.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.