केंद्र व राज्य सरकारकडून सत्तेसाठी बजेटची खिराफत, अन्नदात्या शेतकऱ्यांना कोणतेही मदत नाही :- चेतन नरोटे
शासनाने शेतकऱ्यांना ताबडतोब आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करून त्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन धोरणे ठरवावे :- दिलीप माने
शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे :- ॲड नंदकुमार पवार
सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ जुलै २०२४- केंद्र भाजप व राज्यातील तिघाडी सरकारच्या नियतीमध्ये खोट असल्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना कोणतेही मदत केली नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा केली नाही. केंद्रातील भाजप व राज्यातील तिघाडी सरकार शेतकरी विरोधी असून या सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शहराध्यक्ष चेतन नरोटे,कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट समोर धरणे आंदोलन आयोजित केले होते. यावेळी केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की,परवा बजेट झाले असून सत्ता टिकविण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने आंध्र प्रदेश,बिहार ला हजारो कोटींचा निधी दिले.अनावश्यक गोष्टींसाठी सवलती जाहीर करताना अन्नदात्या शेतकऱ्यांसाठी मात्र कोणतीही मदत, योजना जाहीर केली नाही. त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. राज्यातील महायुती सरकार ही शेतकऱ्यांबाबत गंभीर नाही. म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे तेलंगणाच्या धर्तीवर शेतकऱ्यांचे कर्जे माफ झाली पाहिजे,दुधाला शेतीमालाला हमी मिळाला पाहिजे तसेच आर्थिक पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावे अशी मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत.

यावेळी माजी आमदार दिलीप माने म्हणाले की,आज शेतकरी अडचणीत असताना शासन बजेट मध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करतील असे वाटले होते पण तसे काहीही केलेले नाही. या विरोधात तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे, पीक विमा योजनेत सर्व पिकांचा समावेश झाला पाहिजे, शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कांदा आयात निर्यात धोरण ठरविण्यात यावे.वीज बिलात सवलत देण्यात यावी. दुबार पेरणी साठी मदत करावी,शेतीसाठी लागणाऱ्या खते,बी.बियाणे,औषधांचे दर कमी करण्यात यावे यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत.
यावेळी बोलताना जिल्हा कार्याध्यक्ष ॲड नंदकुमार पवार म्हणाले की, शेतकरी ऊन, थंडी पावसाची पर्वा न करता शेतात कष्ट करून धान्य पिकवतो. शेतीवरच इतर अनेक उद्योगधंदे अवलंबून आहेत. सध्या शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांना बजेट मध्ये कर्जमाफी आणि आर्थिक मदत करणे गरजेचे होते ते केले नाही म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहोत.

या धरणे आंदोलनात सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे,जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार,माजी आमदार दिलीप माने, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, तालुकाध्यक्ष हरिष पाटील,दादासाहेब साठे,शालिवाहन माने देशमुख,महादेव कोगनुरे,महिलाध्यक्ष प्रमीलाताई तुपलवंडे, राजेश पवार,सुभाष चव्हाण,अशोक देवकते, भारत जाधव,अंबादास बाबा करगुळे, उदयशंकर चाकोते,हणमंतू सायबोलू, भोजराज पवार,गंगाधर बिराजदार,तिरुपती परकीपंडला,लक्ष्मण भोसले,नजीब शेख,भीमाशंकर टेकाळे, सिद्धाराम चाकोते, संभाजी भडकुंबे, प्रथमेश पाटील, सोमनाथ गायकवाड,बाळासाहेब पाटील,प्रवीण वाले,एजाज बागवान, वैभव पाटील,धोंडप्पा तोरणगी,नाथा ऐवळे, रुपेश गायकवाड, दीनानाथ शेळके,किसन भिंगारे,शावराप्पा वाघमारे,गोवर्धन जगताप, ज्ञानोबा साखरे, अजय रेवजे, रवींद्र शिंदे, लखन गायकवाड, सागर उबाळे, शिवशंकर अंजनाळकर, विकास पाटील, किरण राठोड, अनिल मस्के, युवराज जाधव, मुश्ताक लालकोट, धीरज खंदारे, महेंद्र शिंदे, विवेक कन्ना,राजेंद्र शिरकुल,मोतीराम चव्हाण, अल्लाउद्दीन शेख,कृष्णदेव वाघमोडे, रविकांत पाटील, शिवशरण मुलगे, रविकांत चांदोडे, पवणकल्याण कोमाकुल, अनिकेत फताटे, कासिम शेख, राजकुमार राठोड,सिद्राम पवार, सतिष सुर्वे, अप्पू शेख, नागेश म्याकल,रशीद शेख,सतिश पाचकुडवे, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, राधाकृष्ण पाटील, निखिल भोसले, किरण सुर्वे, मायप्पा होनमाने, संभाजी पाटील, मेघश्याम गौडा, समीर काझी, श्याम केंगार, हसीब नदाफ, वसिष्ठ सोनकांबळे, सुनील डोळसे, अंजली क्षीरसागर, सुमन जाधव, अरुणा बेंजरापे, शोभा बोबे, सुमन जाधव, लता सोनकांबळे,अजित पाटील, शिवाजी राठोड,मल्लेशी मंडोली, राज बिडला,नवनाथ गोरंटला, शिवानंद मनुळे, श्रीशैल रणखांबे, अप्पासाहेब बगले, हाजीमलंग नदाफ, हरून शेख, इरफान शेख, विनोद रणसुरे, सायमन गट्टू,राजेंद्र मोरे, देवेंद्र सैनसाखले,अकबर शेख,श्रीशैल रणधीरे,शिवाजी साळुंखे, शशिकांत जाधव, अमीर शेख, सुरेखा पाटील,शुभांगी लिंगराज, करीमुनिःसा बागवान, मुमताज तांबोळी, वसीम फुलारी,सलीम मनुरे,अभिलाष अच्युगटला,चंद्रकला निजमल्लू, सलीम शेख यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.