समाजसेवक राजेंद्र फुगारे आणि त्यांची कन्या शिवांशी फुगारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवक राजेंद्र फुगारे व त्यांची कन्या शिवांशी हिच्या वाढदिवसा निमित्त गोपाळपूर येथे मातोश्री वृद्धाश्रम मध्ये अन्नदान करण्यात आले तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.

याप्रसंगी पाटबंधारे अधिकारी सोमनाथ देशमुख,ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील, राम पाटील,गणेश दांडगे ,बंडू काटे,रमेश शिंदे,गणेश गायकवाड,गोपाळ माळी,अमृता पाटील,राजाभाऊ फुगारे मित्र परिवार तसेच सर्व फुगारे परिवार, नेहरू युवा मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
समाजसेवक नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ फुगारे यांच्या वाढदिवसानिमित्त ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठलचे संचालक सचिन वाघाटे हे होते तर उद्घाटन पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रमोद साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रेरणा बीज भंडारचे युवा उद्योजक सिद्धेश्वर दांडगे बोलताना म्हणाले की, तरुणांनी रक्तदान करावे कारण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.राजाभाऊ नेहमी सामाजिक बांधिलकी जपतात त्यांनी अशीच समाजसेवा करावी असा वाढदिवसा निमित्त संदेश दिला.
हभप रवी महाराज काळे कीर्तनकार यांनी याप्रसंगी आशीर्वाद दिला.यावेळी त्यांनी राजभाऊ फुगारे समाजाला एक वेगळा आदर्श निर्माण करून देणारे व्यक्तिमत्व आहे कारण त्यांना परमार्थ्याची आवड व निस्वार्थ सेवा समाजसेवा करण्यास आवडते असे संबोधित केले.

या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस पाटील उमेश खरबडे, सरपंच विजय सरतापे ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील, गणेश दांडगे, विनोद दांडगे,कृष्णा लाटे अक्षय दांडगे,रियाज शेख आरोग्य सेवक,संदीप शिखरे,संजय फुगारे, विजय फुगारे, कुमार माने, बाळू माने कार्यक्रमाप्रसंगी नेहरू युवामंडळाचे सर्व अधिक पदाधिकारी उपस्थित होते.