कासेगाव येथे मा.आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त महिला आरोग्य शिबीर
कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रशांत भैय्या देशमुख युवा मंच कासेगांव यांच्या वतीने आयोजन

कासेगांव/शुभम लिगाडे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि. 16 ऑगस्ट-विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या 60 व्या वाढदिवसा निमित्त महिला आरोग्य शिबीर घेण्यात आले.
या आरोग्य शिबीरामध्ये स्त्री रोग तपासणी व नेत्र तपासणी आणि मानसोपचार तज्ञांकडून स्त्रियांच्या जीवनशैलीविषयी मार्गदर्शनही करण्यात आले.

हे आरोग्य तपासणी शिबीर कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रशांतभैय्या देशमुख युवा मंच कासेगांव यांच्यावतीने आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमास युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक, कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिष गायकवाड,तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. एकनाथ बोधले,पंचायत समितीचे सदस्य प्रशांत देशमुख,सुरेश देशमुख,स्त्री रोग तज्ञ डाॅ.घाडगे मॅडम,मानसोपचार तज्ञ डाॅ. ठेंगील सर व प्राथमिक आरोग्य केंद्र कासेगांव येथील सर्व स्टाफ व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आदींसह मान्यवर उपस्थित होते.



