संपुर्ण देशाचे लक्ष असलेल्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगरमध्ये मेल नर्सिंग विद्यार्थी व मेल नर्सिंग ऑफिसर्स यांनी केला लिंगभेदाविरुद्ध क्रांतिकारक उठाव-अनिल जायभाये बीडकर
जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार मुंबई.व्हाटसअप- ९७६८४२५७५७
संभाजीनगर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०८/ २०२५ : केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अंतर्गत येत असलेल्या AIIMS, DMER,DHS विरोधात परिचर्या संवर्गातील मेल नर्सिंग विद्यार्थी व मेल नर्सिंग ऑफिसर्स यांनी लिंगभेदी धोरणा विरोधी संपुर्ण भारतातमध्ये आंदोलन सुरू केले असून त्याचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्रात सुद्धा गेल्या दोन महिन्यांपासून दिसत आहेत त्याचाच एक भाग म्हणून मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने मराठवाड्यातील छ.संभाजीनगर येथे दि.18.08.2025 रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत आमरण उपोषण आजचा दिवस 4 था करण्यात येत असून राज्य समन्वयक दुर्गादास शिंदे,शंकर नाईकनवरे,सचिन खंदारे हे उपोषणास बसलेले असून त्यांची प्रकृती चिंताजनक बनत चालली असून राज्य सरकार डोळे बंद करून बसले आहे.

दररोज महाराष्ट्रातील नर्सिंग विद्यार्थी,नर्सिंग ऑफिसर्स आंदोलनाला भेट देत असून पाठिंबा देण्यासाठी आजपर्यंत ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार,MIM पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील, काँग्रेस पक्षाचे ॲड .प्रकाश मुंडे,मनसे चे सुमित खांबेकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अभय टाकसाळ, काँग्रेसचे शेख युसूफ,भीमशक्तीचे दिनकर ओंकार,वंचितचे सतीश गायकवाड,सतीश शिंदे,समाजवादी पक्षाचे शेख अय्युब पटेल, आंबेडकरवादी समितीचे विजय वाहूळ, आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे दीपक निकाळजे,बामसेफचे विजय वानखेडे, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष सागर कुलकर्णी, एआयएसएफचे अनंता कराळे,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सुमित पवार,आदित्य घोडके,प्रद्युम्न पराये, रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षातर्फे जिल्हाप्रमुख दिनेश गवळे, सुनील खरात,रणजित मनोरे,अर्शद लखपती, प्रकाश घोरपडे व राजकुमार अमोलिक आदींनी भेट देऊन पाठिंबा दिला तसेच राज्य शासनाकडून घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे,DMER च्या प्रादेशिक कार्यालयाच्या सहसंचालक शिल्पा दोमकुंडवर मॅडम तसेच मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्य समितीचे राज्य समन्वयक सम्यक जमदाडे,डेव्हिड लोखंडे, आदी बनसोडे, अविनाश ब्राह्मणे, अजय मराठे, सतीश सर्वगोडे, राजाभाऊ राठोड, किरण घाडगे, अजित गीते, शुभम काकड, अनिकेत गायकवाड, हर्ष सानप,संभाजी लोखंडे, निखिल येवले, रणजीत आंधळे, रूपा जामदार,शीतल जायभाये सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यात लोकशाही पद्धतीने निषेध करत आहेत तरी केंद्र आणि राज्य शासन यांचे वेळकाढू उदासीन धोरण* दिसत असून मेल नर्सिंग विद्यार्थ्यांना आणि अभ्यास करणाऱ्या मेल नर्सिंग ऑफिसर्स यांना कायमचे बेरोजगार,अपंग करण्याचे मोठे षडयंत्र,महापाप दिसत असून शासनाच्या विरुद्ध असंतोषाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही याची जबर किंमत शासनाला मोजावी लागेल असा इशारा मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

