अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत द्या; सोलापूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करा
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनोद भोसले यांची मागणी
सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ सप्टेंबर : सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सीए विनोद धर्मा भोसले यांनी जिल्हाधिकारी सोलापूर कुमार आशीर्वाद यांना निवेदन सादर करून शासन दरबारी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.

विनोद भोसले यांनी निवेदनाद्वारे खालील नमूद मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –
१. जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी रु. ५० हजार मदत द्यावी. २. सोलापूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा.३. अतिवृष्टीमुळे वाहून गेलेली जनावरे व मृत्यू झालेल्या पशुधनाच्या नुकसानीचा पंचनामा करून योग्य ती नुकसानभरपाई द्यावी.४. पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून कायमस्वरूपी पुनर्वसन व तातडीने फडझडची मदत द्यावी.५. खरीप पिकांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्यावी.
काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्या खासदार प्रणितीताई शिंदे व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार ही मागणी करण्यात आली असल्याचे सीए विनोद धर्मा भोसले यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडले असून त्यांना मदतीचा दिलासा तातडीने मिळणे गरजेचे आहे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनोद भोसले यांच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, VJNT अध्यक्ष युवराज जाधव, सुभाष वाघमारे आदी उपस्थित होते.