पंढरपूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी संदीप पाटील तर उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी भारत जाधव यांची निवड
सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०९/२०२५- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे , खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या शिफारशीनुसार काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी संदीप पाटील तर उत्तर सोलापूर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी भारत जाधव यांची निवड केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी आज रोजी जाहीर करतानाच ते काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी जोमाने काम करतील अशा अपेक्षा करत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.