श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने नवरात्रीचे औचित्य साधून परिवार देवता मंदिरांमध्ये विशेष प्रसाद वाटपाचा कार्यक्रम

श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक श्री. महालक्ष्मी माता पोशाख सह अलंकार परिधान,

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने नवरात्रीचे औचित्य साधून परिवार देवता मंदिरांमध्ये विशेष प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित.

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.28- घटस्थापनेपासून नवरात्र महोत्सवास सुरवात झाली आहे. या निमित्त दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे सातव्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये रूक्मिणी मातेस महालक्ष्मी पोशाख परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली.

श्री विठ्ठलास (मस्य अवतार) सोने मुकुट,नाम हिऱ्याचा,कौस्तुभ मनी,हिऱ्याचा कंगण जोड, दंड्पेटया,मोत्याचा तुरा,मोत्याची कंठी,शिरपेच मोठा, तोडे जोडे,मारवाडी पेट्या मोत्याचा हार,पैंजण जोड, नवरत्नाचा हार,चांद मस्त्य इ.अलंकार परिधान करण्यात आलेली आहेत. 

रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट,मस्य जोड,सूर्य सोन्या मोत्याचे तानवड जोड,मोठी नथ,कर्ण फुले जोड,चिंचपेटी हिरवी,मन्यामोत्याच्या पाटल्या जोड, जवेची माल २ पदरी,कोल्हापुरी साज,दशावतारी हार, बाजूबंद जोड, पेट्याची बिंदी, चंद्रहार, मण्यांची कंठी, अष्टपैलू मण्यांची कंठी, लक्ष्मीहार, पुतळ्यांची माळ, रूळ जोड, पैंजण जोड, इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

राधिका मातेस चिंचपेटी तांबडी,जवमणी पदक, ठुशी,जवेची माळ,मोहरांची माळ तर सत्यभामादेवीला ठुशी,जवेची माळ,हायकोल,पुतळ्यांची माळ अलंकार व प्रथा परंपरेप्रमाणे पोशाख परिधान करण्यात आलेले आहेत.मंदिर समितीच्या अख्त्यातरीत असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई,अंबाबाई, पद्मावती,यल्लमादेवी,यमाई-तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपारिक पोषाख करण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

नवरात्री निमित्त परिवार देवता मंदिरात विशेष प्रसाद वाटप कार्यक्रम संपन्न

नवरात्रीच्या पावन उत्सवाचे औचित्य साधून श्री अंबाबाई देवी मंदिर, श्री यल्लामा देवी मंदिर, श्री यमाई तुकाई देवी मंदिर, श्री पद्मावती देवी मंदिर, श्री रेणूकमाता मंदिर, श्री शाकंबरी देवी मंदिर व श्री लखुबाई देवी मंदिर येथे भाविकांना प्रसाद म्हणून नायलॉन शाबुदाणा वाटप करण्यात आला. याप्रसंगी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे, सदस्य संभाजी शिंदे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, विभाग प्रमुख अतुल बक्षी व सहाय्यक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला.

Leave a Reply

Back To Top