कॉरिडॉर बाधितांच्या वतीने येथील कालिकादेवी मंदिरामध्ये महाआरती संपन्न
पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती व सो.क्ष.कासार समाज यांच्यावतीने श्री कालिकामातेच्या मंदिरात महाआरती
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपुरात कॉरिडॉर बाधितांच्या वतीने येथील कालिकादेवी मंदिरामध्ये महाआरती संपन्न झाली.भाविकसेवेपासून आम्हाला वंचित करू नये श्री विठ्ठलापासून आम्हाला दूर लोटू नये असे साकडे घालण्यासाठी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती व सो.क्ष. कासार समाज यांच्यावतीने श्री कालिकामातेच्या मंदिरात महाआरती करण्यात आली.

बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह कुलकर्णी इचगावकर यांचे हस्ते ही आरती करण्यात आली.कासार समाजाचे सोमनाथ होरणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
याप्रसंगी बोलताना अभयसिंह इचगांवकर म्हणाले,मातेचा आशीर्वाद आपल्यावर आहे आपण चांगल्या कार्यासाठी व भाविकांच्या हिताच्या दृष्टीने पूर्वापार कार्यरत आहोत त्यामुळे निश्चितपणे आपले साकडे श्री कालिकामाता ऐकणार आहे. शुक्रवारी चौफाळातील सरस्वती देवीला महाआरती झाली व आज कालिका मंदिरातील कालिका मातेला महाआरती झाली.दोन्ही वेळेला पर्जन्य राजाने आपल्याला मोकळीक दिली आहे याचाच अर्थ, आपल्या कार्याला मातेचा आशीर्वाद आहे. आपल्याला या कार्यात यश मिळणार आहे.
सो.क्ष.कासार समाजाचे अध्यक्ष विजय मोहोळकर यांनी सांगितले की आमचे बरेचसे समाजबांधव बाधित असून त्यांच्या सह इतर बाधितांसाठी व पंढरीच्या पावित्र्य रक्षणासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत. श्री. कालिकादेवी मंदिर संस्था ही वारकरी, भाविक, व स्थानिकांच्या सेवेत नवीन स्वरूपात कार्यरत आहे.विविध धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर आहे.

याप्रसंगी बचाव समितीचे ह.भ.प.माऊली महाराज गुरव, नामदेव शिंपी समाज अध्यक्ष बापूसो उंडाळे,व्यंकटेश गलगलकर ,अनिल गवळी,संतोष बडवे,अशोक लाड,वैभव रणदिवे,गंगाखेडकर,रोपळकर,महिला आघाडी डॉ. प्राजक्ता बेणारे,सौ.बडवे, पिंपळनेरकर,सौ.केसकर मँडम,सौ.अचलारे आदिंसह बाधित उपस्थित होते.ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर यांनी सदर कार्यास कालिकामाता आशीर्वाद देवून भक्तांचे मनोरथ पूर्ण करेल असे सांगितले.
सो.क्ष.कासार समाजाचे अभय भिवरे,राज येवनकर,अमित मांगले यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम घडवून आणला.