कोंढरकी येथे ए.पी.आय.सुरज निंबाळकर यांचा नेहरू युवा मंडळाच्यावतीने सत्कार
जिद्द चिकाटीच्या जोरावर कोणती गोष्ट अशक्य नाही – ए.पी.आय.सुरज निंबाळकर
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील कोंढरकी ग्रामस्थ व नेहरू युवा मंडळाच्यावतीने ए.पी.आय.सुरज निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला.

या सत्कारप्रसंगी बोलताना ए.पी.आय. सुरज निंबाळकर यांनी आपला जीवनप्रवास सांगताना वडिलांचे अकाली निधन झाल्याने घरातील कर्ता पुरुषाची जबाबदारी माझ्यावर असल्याकारणाने बारावी नंतर कष्ट करून कौटुंबिक जबाबदारी सांभाळत हे यश प्राप्त केले.अनेक संकटांवर मात करीत एमपीएससी परीक्षा देत 2015 मध्ये पीएसआय पदी निवड झाली. सुरूवात गडचिरोली येथे व नंतर सोलापूर येथे गुन्हा शाखेत कर्तव्य बजावत असताना त्यांना पदोन्नती मिळाली असुन मुंबई पोलीस येथे एपीआय म्हणून नेमणूक झाली आहे.या सर्व यशाचे श्रेय हे कुटुंबातील सर्व सदस्य व मित्रपरिवामुळे शक्य झालेले आहे.त्यांनी युवा पिढीला मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्न करण्यास सांगितले.जिद्द चिकाटीच्या जोरावर कोणती गोष्ट अशक्य नाही असा संदेश त्यांनी दिला.

नेहरू मंडळाचे राजेंद्र फुगारे बोलताना म्हणाले की, कलियुगामध्ये आईची संस्कार चांगले असतील तर मुलं चांगलीच घडतात म्हणूनच आईच्या आशीर्वादाने आपली मित्र सुरज निंबाळकर यांचा प्रवास एपीआय पदापर्यंत पोहोचला आहे.

यावेळी नेहरू युवा मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील, समाजसेवक राम पाटील, हनुमान पाटील,नवनाथ पाटील, अज्ञान दांडगे,आनंद दांडगे,सागर दांडगे, प्रताप दांडगे,राहुल नागणे,सागर नागणे, मुंबई पोलीस सचिन मांजरे,नितीन दांडगे, विनोद लाटे,दांडगे पाटील परिवार आणि कोंढारकी ग्रामस्थ उपस्थित होते.