27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन ते 2 आक्टोंबर महात्मा गांधी जयंती निमित्ताने सरकोली ता पंढरपूर कृषी व तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळावरील सप्ताहाचा समारोप
सरकोली कृषी व तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळावर स्वच्छता अभियान

सरकोली/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/१०/ २०२५- सोलापूर सोशल फाउंडेशन मार्गदर्शित व आमदार सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतून आज महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्ताने दि 2 आक्टोंबर 2025 रोजी सकाळी ९.०० वा सरकोली कृषी व तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.त्यानंतर सुनील ब्रह्मदेव भोसले यांच्या स्वखर्चातून स्मृतीशेष सिनाबाई ब्रम्हदेव भोसले योगा ,प्राणायाम गार्डन च्या कामाचा शुभारंभ डॉ संजय कुमार भोसले,सरपंच शिवाजी आप्पा भोसले, ग्रामसेवक श्री शेनवे,वस्ताद लक्ष्मण तात्या भोसले,नंदकुमार सावळे सर, रामभाऊ कराळे,आण्णासाहेब भोसले सर, मोहन भोसले सर,सुनील भोसले यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आले.

त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या महापुरुषांच्या जीवन कार्यावर,स्वच्छता व पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण, पर्यटन स्थळ विकास यावर हाणुमंत भोसले सर, आण्णा साहेब भोसले सर,सुनील भोसले व विलास भोसले यांनी विचार व्यक्त केले.

त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना व गावकरी बांधवांना पर्यटन स्थळाचेवतीने केळी, चिवडा व शिवरत्न मॉलचे पिसे बंधू यांच्यावतीने बिस्किट पुडे व अल्पोपहार देण्यात आला.
