सादिक खाटीक यांच्या मागण्यांचे ठरावात रूपांतर शेटफळे येथील साहित्यिक मेळाव्यात केले गेले

सादिक खाटीक यांच्या मागण्यांचे ठरावात रूपांतर शेटफळे येथील साहित्यिक मेळाव्यात केले गेले

शंभरावे अखिल मराठी साहित्य संमेलन आटपाडीत घ्या

आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि .०१ /१०/२०२५ – आटपाडी तालुक्यातील साहित्यीकांच्या प्रत्येक ठिकाणच्या स्मारकां साठी २५ एकर जागा आणि १०० कोटी रुपये द्यावेत आणि शंभरावे अखिल मराठी साहित्य संमेलन पाच संमेलनाध्यक्ष देणाऱ्या आटपाडीत घ्यावे या आटपाडीचे ज्येष्ट पत्रकार सादिकभाई खाटीक यांनी जाहीररित्या केलेल्या मागणीचे ठराव आज शेटफळे येथे संपन्न झालेल्या साहित्य संमेलनात टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले.

मराठी भाषेचे आधुनिक वाल्मीकी, महाकवी ग.दि. माडगुळकर यांच्या १०७ व्या जयंतीदिनानिमित्त शेटफळे येथे ग.दि . माडगुळकर स्मारक समिती शेटफळेच्या वतीने आज घेतल्या गेलेल्या ३३ व्या गदिमा पारावरील साहित्यीक मेळाव्यात अर्थात साहित्य संमेलनात सादिक खाटीक यांनी काल केलेल्या लक्षवेधी मागण्यांची खास ठरावाद्वारे दखल घेतली गेली .

आटपाडी तालुका साहित्यिकांचे माहेरघर आहे .या तालुक्याच्या ५ शब्दप्रभुंना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होताना पाहिले आहे.या छोट्या तालुक्याचा मराठी सारस्वतात एक सन्मान व्हावा म्हणून १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आटपाडी येथे घेण्यात यावे . त्यासाठी संपूर्ण माणदेशी जनता पाठीशी आहे . अशा आशयाच्या दोन्ही ठरावांना या साहित्यीक मेळाव्यात मान्यता देण्यात आली .

या मेळाव्यात साहित्यीक प्रा डॉ कृष्णा इंगोले,ज्ञानेश डोंगरे, शिवाजी बंडगर, सीताराम सावंत, तानाजी वाघमारे, सुधीर इनामदार, सुनिल दबडे, रमेश जावीर, हरीभाऊ गळवे,प्रा . बालाजी वाघमोडे, प्रा विजय शिंदे, प्रा श्रीकृष्ण पडळकर , चंद्रवर्धन लांडगे, सुखदेव नवले, व्ही एन देशमुख,अरविंद चांडवले, प्रा संभाजीराव गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हे ठराव मंजुर करण्यात आले.

प्रारंभी प्रख्यात दिवंगत साहित्यीक भास्कर चंदनशिव यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

ग.दि.माडगुळकर स्मारक समिती शेटफळेचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ सयाजीराजे मोकाशी आणि खजिनदार चंद्रकांत गायकवाड यांनी सादिक खाटीक यांनी केलेल्या लक्षवेधी, न्याय आणि यथायोग्य मागण्यांचे ठराव व्हावेत, यासाठी पुढाकार घेतला व दोन्ही ठरावांना अनुमोदन दिले .

Leave a Reply

Back To Top