उत्तराखण्डात घरासमोरून बिबट्याने मुलाला नेले

[ad_1]

leopard
उत्तराखंडच्या पौरी जिल्ह्यात लॅन्सडाऊन भागात सध्या वन्य प्राणांची दहशत वाढत आहे.एका बिबट्याने घरासमोरून खेळत असलेल्या मुलाला नेले. 

 

सदर घटना सोमवार संध्याकाळची आहे. संध्याकाळी 7:30 वाजेच्या सुमारास रिखनीखलच्या कोटा गावात घराच्या समोरून एका सहा वर्षाच्या मुलाला बिबट्याने मुलाच्या आईच्या समोरून नेले. मुलाची आई आपल्या माहेरी रक्षाबंधनाच्या निमित्ताने आली होती. मुलाची आई आणि आजी अंगणात बसले होते आणि हा मुलगा खेळत होता. तेवढ्यात जंगलाच्या दिशेने एक बिबट्या आला आणि त्याने तोंडात धरून मुलाला नेले. आई आणि आजीने आरडाओरड केली पण तो बिबट्या जंगलाच्या दिशेने पळून गेला. 

या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या वर  त्यांनी मुलाचा शोध घेतला. शोधाशोध केल्यावर मुलाचा मृतदेह पहाटे 1:30 वाजेच्या सुमारास कोटा गावापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर जंगलात एका झुडपात आढळला. मुलाच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवले. शवविच्छेदनानन्तर मुलाचा मृतदेह कुटुंबियांना दिला आहे. 

Edited by – Priya Dixit   

 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top