पुरग्रस्त गावात स्वच्छता मोहिमेने घेतला वेग,नोडल अधिकारी गावात तळ ठोकून..मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे आदेश

पुरग्रस्त गावात स्वच्छता मोहिमेने घेतला वेग …

नोडल अधिकारी गावात तळ ठोकून ..

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे आदेश

सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर जिल्हा परिषदेने पुढाकार घेत सिना व भीमा नदी काठच्या ८० गावांत स्वच्छता मोहिमेने वेग घेतला आहे. जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी स्वच्छता मोहिम गतीमान केली आहे.

आज तिर्हे व पाथरी येथे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी पुरग्रस्त भागात भेट देऊन युध्दपातळी वर सुरू असलेले स्वच्छता मोहिमेची पाहणी करून सुचना दिल्या. तिर्हे येथे पुराचे पाणी शाळा व अंगणवाडी तसेच सार्वजनिक इमारतीमध्ये शिरल्यामुळे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. तसेच मंदिरात देखील गाळ साचला आहे. टॅंकर द्वारे पाण्याचे फवारे मारून स्वच्छता करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील गाळ साचला आहे.

आज सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी उंदरगाव येथे भेट देऊन ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग घेतला.स्वतः प्लास्टिक कचरा वेचत त्यांनी ग्रामस्थांनी प्रेरणा दिली.जिल्हा प्रशासन,ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांच्या सहभागातून जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छता मोहीम व त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री पुरवली जात आहे.पूरग्रस्त कुटुंबीयांच्या परिसरात त्यांनी स्वच्छतेची कामे स्वतःहून करून नागरिकांना धीर दिला. अशा गंभीर संकट काळात शासन सर्वतोपरी मदतीसाठी सोबत असल्याचे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिले.

आज प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी तिर्हे, पाथरी गावात पायी चालत सर्व सार्वजनिक शासकीय इमारतींची पाहणी केली. सोबत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, संवाद सल्लागार सचिन सोनवणे उपस्थित होते. पाथरी येथे नव्याने बांधल्या प्रशस्त आरोग्य केंद्रास देखील पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. या ठिकाणची सर्व स्वच्छता करणेत येत आहे. सार्वजनिक इमारती बरोबर पुराचा फटका बसलेल्या ग्रामस्थांचे घरातदेखील निर्जतूकरण करण्याच्या सुचना प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी दिल्या आहेत.

तिर्हे येथील स्मशानभुमीतील गाळ आज जेसीबीच्या सहाय्याने हटविणेत आला आहे. त्या ठिकाणची पाहणी जाधव यांनी करून पुर्ण गावात स्वच्छता मोहिम राबविण्याचे सुचना दिले आहेत.आज पंचायत समिती उत्तर सोलापूर मधील गटविकास अधिकारी राजाराम भोंग, विस्तार अधिकारी सचिन चव्हाण, विस्तार अधिकारी कल्याण श्रावस्त्री, पंचायत अधिकारी अनिसा बागवान, ग्रामविकास पंचायत अधिकारी पाटील, सीआरसी आम्रपाली गजघाटे, मोनिका दिनकर यासह अंगणवाडी सेविका,आरोग्य विभागाचे कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, सरपंच, विस्तार अधिकारी पंचायत, तालुक्यातील पंचायत अधिकारी यांची टीम या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाली होते.

गाळ काढून निर्जतूकिरण करा- प्रकल्प संचालक अमोल जाधव

गावात नाम फाऊंडेशन तसेच सर्व शासकीय यंत्रणा राबविण्यात येत आहे. अंगणवाडी केंद्र,आरोग्य केंद्र, मंदिरातील गाळ काढून त्याठिकाणी निर्जतुकीकरण करा अशा सुचना प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी दिल्या.

Leave a Reply

Back To Top