लक्ष्मी दहीवडीत जुगार अड्ड्यावरील पोलिसांच्या छाप्यात आठ जण अटकेत

लक्ष्मीदहीवडीत जुगार अड्ड्यावरील पोलिसांच्या छाप्यात आठ जण अटकेत

मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहीवडी येथे बसस्टॅंडजवळील पडक्या घरावर छापा टाकत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या आठ जणांना रंगेहात पकडले.या कारवाईत ₹ 5,150/- रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले.

फिर्यादी पोलीस शिपाई सिध्दनाथ अर्जुन शिंदे यांच्या पथकाने कारवाई करत आरोपीत हरी पंडा शिंगाडे,अविनाश माने,कल्लप्पा वेळापुरे,विलास सोनवले, शिवाजी सरगर, कुमार पाटील, संतोष कोळेकर सर्व रा. लक्ष्मीदहीवडी व भारत सोनवले रा.महमदाबाद शेटफळ यांनी अटक केली आहे.

सर्व आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोहेकाँ श्री.हाके करीत आहेत.

Leave a Reply

Back To Top