अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर मनोर पोलीस ठाणे यांची कारवाई

अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर कारवाई करून एकूण ३८,९२,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

मनोर पोलीस ठाणे यांची कारवाई

पालघर/ ज्ञानप्रवाह न्यूज –पोलीस अधीक्षक पालघर यतिश देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना सक्त सुचना दिलेल्या आहेत.

दिनांक ०५/१०/२०२५ रोजीचे रात्रौ मनोर पोलीस ठाणेचे पथक हे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पेट्रोलींग करत असताना दि.०६/१०.२०२५ रोजी पहाटे ०५.०० वाजता गोपनीय बातमीदाराने मेरिगोल्ड हॉटेल चिल्हार येथे एक वाहन क्र. KA56-7260 यामध्ये अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थ असल्याची माहिती दिली.

नमूद माहितीच्या आधारे मनोर पोलीसांचे पथकाने मेरिगोल्ड हॉटेल चिल्हार येथे जाऊन खात्री केली असता मुंबई- अहमदाबाद महामार्गालगत सर्व्हिस रोडवर वर नमूद KA56-7260 क्रमांकाचे वाहन दिसून आले.सदर वाहन चालकास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव अनिस रफिक शेख,रा.छत्रपती संभाजीनगर असे सांगितले. नमूद चालकास वाहनामधील मालाबाबत विचारपुस केली असता पार्सल गोणी असल्याचे सांगून गोणीमध्ये काय माल आहे याबाबत माहिती न दिल्याने वाहनामध्ये चेक केले असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला एकूण १३,९२,०००/- रुपये किंमतीचा सुगंधी पान मसाला व इतर तंबाखूजन्य पदार्थ मिळून आला. त्यामुळे आरोपीकडून वाहनासह एकूण ३८,९२,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमूद आरोपींविरूध्द मनोर पोलीस ठाणे येथे २७२/२०२५ भारतीय न्याय संहीताचे कलम १२३, २२३,२७४,२७५, सह अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ नियम व नियमने २०११ चे कलम २६ (२), २७, २३, २६ (२) (४), ३० (२) (अ) सहवाचन मा. अन्न सुरक्षा आयुक्त महाराष्ट्र राज्य अधिसुचना अ.सु. म.अ./अधिसुचना/४११/२०२५/७ दि.१२/०७/२०२५ Regulation no 2,3,4 of Food Safety & Standards (Prohibition and Restrictions on Sales) Regulation 2011, सहवाचन Regulation no.3,1,7 of Food Safety & Standards (Food Products Standards and Food Additives) Regulation 2011 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीस अटक केले असून पुढील तपास हा सपोनि/रत्नदिप साळोखे नेमणूक मनोर पोलीस ठाणे हे करत आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक यतिश देशमुख पालघर,अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे पालघर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रभा राऊळ पालघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/रणवीर बयेस, सपोनि/रत्नदिप साळोखे,पोहवा/प्रविण कामडी, चालक पोहवा/ राजेंद्र आतकरी, पोना/ प्रविण थोटगा, पोअं/ प्रितम वसेकर सर्व नेमणुक मनोर पोलीस ठाणे यांनी केली.

Leave a Reply

Back To Top